T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात बुमराहने केवळ 2 विकेट्स घेतल्या. पण या विकेट्सनेच त्याने एक मोठा मान मिळवत सामन्यातील अप्रतिम गोलंदाजीने एक विश्वविक्रमही केला आहे.

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा 'विकेट वीर'
जसप्रीत बुमराह,
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:19 AM

T20 Cricket World Cup 2021: भारतीय संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसरा विजय स्कॉटलंडच्या संघाला (India vs Scotland) 8 गडी राखून मात देत मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करताना अतिशय उत्तम अशा गोलंदाजीचे दर्शन घडवले. सामन्यात जाडेजा आणि शमीने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. पण 2 विकेट्स घेणाऱ्या बुमराहचीच हवा झाली. कारण बुमराहने सामन्यात 2 विकेट्ससह एक मेडन ओव्हर अर्थात निर्धाव षटकही टाकलं. ज्यामुळे त्याने एका विश्वविक्रमाला गवासणी घातली आहे.

सामन्यात जसप्रीत बुमराहने 3.4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 10 धावा देत  2 विकेट्स घेतल्या यावेळी त्याचा इकॉनमी रेट केवळ 2.7 इतकाच होता. विशेष म्हणजे यावेळी त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विश्वविक्रम बुमराहने केला आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 8 मेडन ओव्हर टाकल्या आहेत.

भारताचा ‘विकेट वीर’

सामन्यात बुमराहने 2 विकेट्स घेत भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स पटकावण्याचा मानही मिळवला आहे. बुमराहने युजवेंद्र चहलला मागे टाकलं आहे. चहलच्या नावावर 63 विकेट्स आहेत. तर बुमराहने आजच्या 2 विकेट्सनी एकूण 64 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स स्वत:च्या नावे केल्या आहेत.

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याचा लेखाजोखा

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीने स्कॉटलंडच्या फलंदाजांना चक्रावून सोडलं. भारताकडून जाडेजाने आणि शमी यांनी प्रत्येकी 3, तर बुमराहने 2 आणि आश्विनने एक विकेट घेतली. तर शमीच्याच ओव्हरला इशानने एका गड्याला रनआउट देखील केलं. ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ केवळ 85 धावाच करु शकला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा सलामीवीर मुन्सीने 24 आणि लीस्कने 21 इतक्याच केल्या.

अवघ्या 86 धावांचं आव्हान भारतासमोर होतं. जे पूर्ण करण्यासाठी भारताने केवळ 39 चेंडूच घेतलं. यात सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी 80 धावा केल्या. दोघांच्या बॅट अक्षरश: आग ओकत होत्या. रोहितने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकार ठोकत 30 धावा केल्या. तर राहुलने विश्वचषकातील वेगवान अर्धशतक ठोकत 19 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार ठोकत 50 धावा केल्या. राहुल बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 4 धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने षटकार खेचत संघाचा विजय पक्का केला.

हे ही वाचा-

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाजी, पाहा VIDEO

India Cricket team: विराटनंतर टी20 संघाचा कर्णधार कोण?, तिघांमध्ये चुरशीची लढत, द्रविडची पसंती कोणाला?

Diwali Celebration: मास्टर-ब्लास्टरची मुलगी साराचा फेस्टीव्ह लूक पाहिलात का?, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हे PHOTO पाहाच!

(Jasprit bumrah made maiden over world record and also highest wicket taker for india)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.