IND vs SL ODI Series: Jasprit Bumrah वनडे सीरीजमधून OUT, 6 दिवसात असं अचानक काय झालं?

IND vs SL ODI Series: जसप्रीत बुमराहचा 3 जानेवारीला वनडे सीरीजसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण आता अचानक तो खेळणार नसल्याच सांगण्यात आलय.

IND vs SL ODI Series: Jasprit Bumrah वनडे सीरीजमधून OUT, 6 दिवसात असं अचानक काय झालं?
Jasprit Bumrah Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 2:22 PM

मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमधून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियात पुनरागमन करणार होता. पण आता अस होणार नाहीय. जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय. जसप्रीत बुमराहला आधी वनडे सीरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण 3 जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला. या निर्णयानंतर, अवघ्या 6 दिवसात जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याच सांगण्यात आलय.

अचानक का माघार घेतली?

जसप्रीत बुमराहच्या बाबतीत बीसीसीआयला अजिबात घाई करायची नाहीय. बुमराह टीमच्या दुसऱ्या खेळाडूंसोबत गुवाहाटीमध्ये पोहोचलेला नाही. क्रिकबजने हे वृत्त दिलय. गुवाहाटीमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळायचा आहे.

NCA ने जसप्रीत बुमराहला फिट घोषित केलं होतं

जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. पाठिच्या दुखण्यामुळे तो वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. त्याला फिट घोषित करण्यात आलं. एनसीएने फिट घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला. पण आता अचानक बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठल्या सीरीजपासून जसप्रीत बुमराह टीममध्ये परतणार?

जसप्रीत बुमराह न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये खेळताना दिसू शकतो. ही सीरीज 18 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहचा फिटनेस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्याशिवाय वनडे वर्ल्ड कपमध्येही खेळणार आहे. टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल. भारताची वनडे टीम:

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.