Ranji Trophy: टीम इंडियात एंट्रीसाठी ज्याने 12 वर्ष वाट पाहिली, त्याने 9 चेंडूत घेतल्या 5 विकेट, दिल्लीची वाट लावली

Ranji Trophy: प्रतिस्पर्धी टीमची त्याने वाट लावून टाकली, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली हॅट्रिक. एकट्याने काढल्या 8 विकेट.

Ranji Trophy: टीम इंडियात एंट्रीसाठी ज्याने 12 वर्ष वाट पाहिली, त्याने 9 चेंडूत घेतल्या 5 विकेट, दिल्लीची वाट लावली
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 1:41 PM

नवी दिल्ली: सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज आणि कॅप्टन जयदेव उनाडकटची धारदार गोलंदाजी पाहून सगळेच हैराण झालेत. अनेकांना जयदेव उनाडकटच्या कामगिरीवर विश्वास बसला नाही. जयदेव उनाडकट डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने दिल्ली विरुद्ध रणजी सामन्यात अवघ्या 12 चेंडूत आपला फाइव्ह विकेट हॉल पूर्ण केला. जयदेव उनाडकटने पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ध्रुव शौरला बाद केलं. त्यानंतर वैभव रावल त्याचा बळी ठरला. दिल्लीचा कॅप्टन यश धुल पहिल्या चेंडूवर आऊट झाला.

10 रन्समध्ये 7 विकेट

जयदेव एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. यावेळी जॉन्टी सिद्धू आणि ललिता यादवची विकेट त्याने काढली. उनाडकटच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीने अवघ्या 10 रन्समध्ये 7 विकेट गमावल्या.

जयदेवचा कहर

सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये जयदेव उनाडकटने दिल्लीची वाट लावून टाकली. त्याचा स्विंग आणि लेंग्थच दिल्लीकडे कुठलही उत्तर नव्हतं. ध्रुव शौरला उनाडकटने बोल्ड केलं. त्यानंतर वैभव रावलला देसाईकरवी झेलबाद केलं. दिल्लीचा कॅप्टन यश ढुलला LBW आऊट केलं. अशा प्रकारे त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली. जॉन्टी सिद्धू सुद्धा उनाडकटच्या अप्रतिम चेंडूवर बाद झाला. ललित यादवला उनाडकटने LBW आऊट केलं. उनाडकटने विकेटकीपर लक्ष्यला बाद करुन आपल्या खात्यात सहावी विकेट जमा केली. उनाडकटने 6 पैकी 4 बॅट्समनला खातही उघडू दिलं नाही. 12 वर्षानंतर टीम इंडियात मिळाली संधी

जयदेव उनाडकट अलीकडेच चर्चेत आला होता. 12 वर्षानंतर त्याला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळालं होतं. उनाडकट बांग्लादेश विरुद्ध मीरपूर टेस्टमध्ये खेळला. उनाडकटने 6 डिसेंबर 2010 रोजी आपला टेस्ट डेब्यु केला. त्यानंतर 22 डिसेंबर 2022 रोजी तो दुसरा कसोटी सामना खेळला. जयदेव उनाडकट सध्या जास्त घातक गोलंदाज बनलाय. जयदेव उनाडकटच्या घातक गोलंदाजीमुळे दिल्लीचा पहिला डाव 133 धावात आटोपला. त्याने एकट्याने 12 ओव्हर्समध्ये 39 धावा देऊन 8 विकेट काढल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.