Jemimah Rodrigues ने विनोदाने एमएस धोनी, विराट कोहली बरोबर केली स्वत:ची तुलना
भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिक्सने विनोदाने स्वत:ची तुलना एमएस धोनी आणि विराट कोहली बरोबर केली.
मुंबई: भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिक्सने विनोदाने स्वत:ची तुलना एमएस धोनी आणि विराट कोहली बरोबर केली. जेमिमाह रॉड्रिक्सने सोशल मीडियावर तिचा, धोनीच आणि विराटचा कोलाज केलेला एक फोटो शेयर केलाय. बॅटिंग करताना आपली विकेट वाचवण्यासाठी धोनी आणि विराट या फोटोत स्वत:ची स्ट्रेचिंग क्षमता दाखवताना दिसतात. जेमिमाहने सुद्धा तिचा एका मॅचमधला असाच एक फोटो दोघांसोबत कोलाज करुन शेयर केलाय. ‘असं दिसतय, मी आता एलिट (वरच्या) कंपनीचा भाग झालीय’ असं तिने विनोदाने टि्वटच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.
स्मृती मंधाना बनण्याची गरज नाही
“2019 च्या आयपीएल महिला टी 20 चॅलेन्ज स्पर्धेच्यावेळी स्मृती मंधानाने मला सांगितलं होतं, “तुला हरमनप्रीत कौर किंवा स्मृती मंधाना बनण्याची गरज नाही. तू जेमिमाह रॉड्रिक्स म्हणून ओळख बनवं. मी ती गोष्ट समजून घेतली, आता मला त्याची मदत होतेय” असं जेमिमाह म्हणाली.
Looks like I’m now part of Elite Company ? pic.twitter.com/EkLJq7BaZF
— Jemimah Rodrigues (@JemiRodrigues) August 16, 2022
ती माझी स्ट्रेंथ आहे
“मी पावर हिटर नाहीय, हे तिने कबूल केलं. गॅप्स मध्ये चेंडू फटकावून एकेरी-दुहेरी धावा काढण्यावर माझा भर असतो” असं जेमिमाह रॉड्रिक्स म्हणाली. “मी माझा खेळ चांगल्या पद्धतीने समजून घेतलाय. मी पावर हिटर नाहीय. मी चेंडू चांगला प्लेस करु शकते. चेंडू गॅप मधून काढून, मी एकेरी-दुहेरी धावा काढू शकते. मैदानात धावा काढण्याचं कौशल्य माझ्याकडे आहे. ती माझी स्ट्रेंथ आहे” असं जेमिमाहने सांगितलं.