ENG W vs IND W: झूलनला निरोप देताना हरमनप्रीतच्या डोळ्यात अश्रू, पहा VIDEO
ENG W vs IND W: क्रीडा प्रेमींसाठी 23 आणि 24 सप्टेंबर असे दोन दिवस भावनात्मक होते.
मुंबई: क्रीडा प्रेमींसाठी 23 आणि 24 सप्टेंबर असे दोन दिवस भावनात्मक होते. या दोन दिवसात दोन महान खेळाडूंनी आपआपल्या क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती घेतली. 23 सप्टेंबरला टेनिस विश्वातील महान खेळाडू रॉजर फेडरर करीयरमधील शेवटचा सामना खेळला. यावेळी टेनिस कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूसह सर्वचजण रडले.
त्यानंतर काही तासातच महान क्रिकेटपटू झूलन गोस्वामी करीयरमधील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. टीम इंडियाची स्टार गोलंदाज झूलनचा हा शेवटचा सामना असल्याने सर्वचजण भावूक झाले होते. खुद्द कॅप्टन हरमनप्रीत कौर स्वत:च्या डोळ्यातील अश्रू रोखू शकली नाही.
त्यावेळी चाहते भावूक झाले
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शनिवारी झूलन निळी जर्सी घालून अखेरची वेळ टींम इंडियासाठी मैदानात उतरली. झूलनचा हा शेवटचा सामना आहे. काही दिवसापूर्वीच ही घोषणा झाली होती. या सामन्याचा क्षण जवळ आला, त्यावेळी चाहते भावूक झाले.
Harmanpreet Kaur in tears for Jhulan Goswami’s last match #ENGvIND | #ThankYouJhulan pic.twitter.com/I8no7MhBSq
— Jhulan GOATswami (@Alyssa_Healy77) September 24, 2022
आपले अश्रू रोखता आले नाहीत
टीम इंडियातील झूलनच्या सहकाऱ्यांसाठी हा भावनात्मक आणि कठीण क्षण होता. आज शेवटच्या सामन्याआधी झूलनचा सन्मान होत असताना हरमनप्रीत कौरला आपले अश्रू रोखता आले नाहीत. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना करण्यापेक्षा पण हरमनप्रीतसाठी ते कठीण होतं. हरमनप्रीतच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यावेळी टीम इंडियाच्य ‘झूलू दी’ ने हरमनप्रीतची गळाभेट घेतली व तिला शांत केलं.
A moment to savour! ? ?
When the legendary @JhulanG10 joined #TeamIndia Captain @ImHarmanpreet for the toss ahead of the third #ENGvIND ODI. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/RwUqefET7e pic.twitter.com/H8A991o2oR
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2022
टॉसच्यावेळी दिला खास सन्मान
हरमनप्रीतने झूलन गोस्वामीला सन्मानित करण्यासाठी टॉसच्यावेळी तिला आपल्यासोबत घेऊन गेली. भारतीय कॅप्टनने हेड किंवा टेल्स बोलण्याची जबाबदारी झूलनवर सोपवली. हरमनप्रीतच्या या पावलाने भारतीय चाहत्यांच मन जिंकलं. झूलनने तिच्या शेवटच्या सामन्यात शानदार प्रदर्शन करुन टीम इंडियाला विजय मिळवून द्यावा, अशीच टीम इंडियाची इच्छा असेल.