पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला धक्का, दोन दिग्गज खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता

3 मार्चपासून ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात 3 कसोटीशिवाय एकदिवसीय आणि टी-20 सामनेही खेळवले जाणार आहेत. परंतु त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील एक महत्त्वाचा खेळाडू या मालिकांमधून बाहेर झाला आहे.

पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला धक्का, दोन दिग्गज खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता
David Warner
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 11:30 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा (Australia) पाकिस्तान (Pakistan) दौरा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरणार आहे. मार्चमध्ये होणाऱ्या या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ ऑस्ट्रेलियाच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेत 5 टी-20 (T20) सामने खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान दौरा आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. पण, त्याआधी जाय रिचर्डसन आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) या दोन मोठ्या खेळाडूंबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्टनुसार, जाय रिचर्ड्सन (Jhye Richardson) पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. रिचर्डसनची दुखापत लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ हे पाऊल उचलू शकते. 25 वर्षीय ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिचर्डसन पायाच्या दुखापतीमुळे अॅशेसच्या शेवटच्या 3 कसोटी सामन्यांना मुकला होता. अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 5 बळी घेतले होते. डेव्हिड वॉर्नरलादेखील श्रीलंकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.

मिचेल स्टार्कची आयपीएलमधून माघार

कोरोनामुळे गेल्या वर्षी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली अशा 7 खेळाडूंमध्ये जाय रिचर्डसन हा एक होता. मात्र, या वर्षाच्या मध्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. रिचर्डसनशिवाय ऑस्ट्रेलिया आपला संघ पाकिस्तानात पाठवण्याच्या तयारीत आहे. मिचेल स्टार्कनेही आयपीएलमधून आपले नाव काढून घेतले आहे. काही खेळाडू पाकिस्तान दौर्‍यासाठी कचरत होते. त्यांनी नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याचा अहवाल पाहिला असून त्यांचेही आता मतपरिवर्तन झाले आहे.

तिन्ही सामने एकाच ठिकाणी

पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी, वनडे व टी-20 सामने खेळविण्यात येणार आहे. तिन्ही कसोटींसाठी पाकिस्तानमधील कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन शहरांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तिन्ही सामने एकाच ठिकाणी होतील, अशी चर्चा सुरू आहे. लाहोरमध्ये 3 वनडे आणि 3 टी- 20 सामने खेळवले जातील, अशी माहिती आहे.

इतर बातम्या

Video : बोलरची हॅट्रिक, अखेरच्या चेंडूवर षटकार किंवा विकेटची गरज, नवा फलंदाज स्ट्राईकवर; सर्वाधिक रोमांचकारी ओव्हर तुम्ही पाहिली का?

ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं

विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

(Jhye Richardson out of Pakistan tour David Warner to miss T20s against Sri Lanka)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.