Joe Root ने मैदानात जादू दाखवली, हात न लावताच बॅट उभी ठेवली, पहा Viral Video
87 धावांवर खेळत असताना, जो रुटने मैदानात आपल्या बॅटची जादू दाखवली. जो रुट नॉन स्ट्राइकवर उभा होता. काइम जेमिसन गोलंदाजीसाठी धावत होता.
मुंबई: इंग्लंडच्या जो रुटने (Joe Root) सध्याच्या काळातला तो सर्वोत्तम कसोटी फलंदाज असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. रुट विराट कोहली, स्टीव स्मिथ आणि विलियमसन सारख्या फलंदाजांच्या पुढे निघून गेला आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने रविवारी लॉर्ड्सवर (Lords Test) शानदार शतक झळकावलं. त्याच्या बळावर इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडे (England) आता 1-0 अशी आघाडी आहे. जो रुटने अडचणीत सापडलेल्या इंग्लिश संघाचा फक्त डावच सावरला नाही, तर त्याने नाबाद 116 धावा फटाकवल्या व संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने विजयासाठी मिळालेलं 277 धावांच लक्ष्य पार केलं. चौथ्या डावात हे लक्ष्य पार करणं खूपच कठीण होतं. या शतकी खेळी दरम्यान जो रुटने क्रिकेटच्या मैदानातच एक जादू दाखवली, ते पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. जो रुटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
जो रुटने दाखवली बॅटची जादू
87 धावांवर खेळत असताना, जो रुटने मैदानात आपल्या बॅटची जादू दाखवली. जो रुट नॉन स्ट्राइकवर उभा होता. काइम जेमिसन गोलंदाजीसाठी धावत होता. त्याचवेळी जे चित्र दिसलं, ते पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. जो रुट नॉन स्ट्राइकवर उभा होता व त्याची बॅट कुठल्याही आधाराशिवाय उभी होती. रुटने बॅटला स्पर्श केला नव्हता, तरीही बॅट उभी होती. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सर्वत्र या व्हिडिओची चर्चा आहे.
I knew @root66 was talented but not as magic as this……. What is this sorcery? @SkyCricket #ENGvNZ ? pic.twitter.com/yXdhlb1VcF
— Ben Joseph (@Ben_Howitt) June 5, 2022
जो रुटला हे कसं शक्य झालं?
आता प्रश्न हा आहे की, रुटला हे कसं शक्य झालं?. कुठल्याही आधाराशिवाय त्याने बॅट कशी उभी करुन ठेवली? खरंतर या मागे कुठलीही जादू नाहीय, याच सिक्रेट रुटच्या बॅटमध्ये दडलं आहे. जो रुटची बॅट फ्लॅट टो आहे. त्यात जराही वळण नाहीय. त्याशिवाय रुटची बॅट रुंद असून तिचा बॅलन्सही चांगला आहे. त्यामुळेच रुटची बॅट कुठल्याही आधाराशिवाय उभी राहू शकते. रुटने या कसोटीत 12 चौकारांनी सजलेल्या खेळीत 10 हजार धावांचाही टप्पा पार केला.