Mumbai Indians साठी Good News, 2 वर्षानंतर Jofra archer च धडाकेबाज कमबॅक, VIDEO
त्याच हे प्रदर्शन बघून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंट आणि फ्रेंचायजी मालक निश्चित आनंदी झाले असतील.
डरबन: इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने धडाकेबाज कमबॅक केलय. आर्चरला मैदानात गोलंदाजी करताना पाहण्याची प्रतिक्षा संपलीय. दक्षिण आफ्रिकेत सुरु झालेल्या T20 लीगसाठी आर्चर मैदानात उतरलाय. त्याने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवलीय. आर्चर जवळपास दोन वर्षांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोफ्रा आर्चर मार्च 2021 भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आर्चर सातत्याने दुखापतींचा सामना करतोय.
दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता
दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये आर्चर मुंबई इंडियन्सची फ्रेंचायजी MI केपटाऊनकडून खेळतोय. मागच्यावर्षी झालेल्या आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने आर्चरला विकत घेतलं होतं. पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. यावेळच्या सीजनमध्ये आर्चर मुंबईकडून खेळू शकतो.
तिसऱ्याच चेंडूवर काढली विकेट
MI केपटाऊन आणि पार्ल रॉयल्समध्ये काल दक्षिण आफ्रिकन टी 20 लीगमधला पहिला सामना झाला. सामन्यातील तिसरी ओव्हर आर्चरला देण्यात आली. या ओव्हरच्या तिसऱ्याच चेंडूवर आर्चरने विकेट काढला. या लीगमधला तो पहिला विकेट होता. आर्चर दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये पहिला विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. पार्ल रॉयल्सच्या विहान लुबेची विकेट त्याने काढली.
बॅक ऑफ द लेंग्थ चेंडू
आर्चरने बॅक ऑफ द लेंग्थ चेंडू टाकला. लेग स्टम्पवर हा चेंडू होता. लुबेने हा बॉल मिडविकेट आणि मिड ऑनच्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटवर योग्य पद्धतीने कनेक्ट झाला नाही, मिडऑनवर उभ्या असलेल्या लिंडेने पळत जाऊन कॅच पकडली.
Jofra Archer picks the first wicket of SA20 upon returning to competitive cricket in 18 months. pic.twitter.com/fUE3mQCg6H
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2023
एकूण 3 विकेट काढले
आर्चर इथेच थांबला नाही. त्याने पार्लचा कॅप्टन डेविड मिलरलाही बाद केलं. आर्चरने मिलरला अर्धशतक पूर्ण करु दिलं नाही. त्याने 31 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 42 धावा केल्या. आर्चरने त्याच्या लास्ट ओव्हरमध्ये ही विकेट काढली. याच ओव्हरमध्ये त्याने फेरिस्को एडम्सची विकेट काढली. खात उघडण्याआधीच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मुंबईच्या इंडियन्सच्या कॅप्टनसह मालक सर्वच खुश
आर्चरने आपल्या कोट्यातील चार ओव्हरमध्ये 27 धावा देऊन तीन विकेट काढल्या. या दरम्यान त्याने एक मेडन ओव्हर टाकली. त्याच हे प्रदर्शन बघून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंट आणि फ्रेंचायजी मालक निश्चित आनंदी झाले असतील. आर्चरला पुन्हा दुखापत होऊ नये, एवढीच त्यांची प्रार्थना असेल.