Mumbai Indians: जोफ्रा आर्चरने सूर्यकुमार यादवसाठी केलेलं खास टि्वट झालं व्हायरल

वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात काल सूर्यकुमार यादवने तुफान खेळी केली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

Mumbai Indians: जोफ्रा आर्चरने सूर्यकुमार यादवसाठी केलेलं खास टि्वट झालं व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 6:50 PM

कोलकाता: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात काल सूर्यकुमार यादवने तुफान खेळी केली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि सात षटकार होते. सूर्यकुमारचा स्ट्राइक रेट 209 पेक्षा पण जास्त होता. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर अक्षरक्ष: तुटून पडला. त्याने कठीण परिस्थितीत कमालीची फलंदाजी केली. या जबरदस्त फलंदाजीनंतर सूर्यकुमार यादववर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सूर्यकुमारची कालची खेळी पाहून त्याचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) एक टि्वट केलंय. या टि्वटचा अर्थ सहजासहजी लक्षात येत नाही. आर्चरचं हे टि्वट आता व्हायरल झालं आहे.

वेंकटेश अय्यरसोबत मिळून सूर्यकुमारने अवघ्या 37 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या सामन्यातच एक क्षण असा होता, जेव्हा धावफलकावर भारताच्या 15 षटकात फक्त 98 धावा होत्या. पण 20 षटकाअखेरीस भारताच्या पाच बाद 184 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार फलंदाजी करत असताना आर्चरने ‘हा मुलगा फलंदाजी करु शकतो’, असं एका ओळीचं टि्वट केलं आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने तब्बल आठ कोटी रुपये मोजून विकत घेतलं आहे. आर्चर दुखापतीमधून सावरत असल्यामुळे या 15 व्या सीजनमध्ये तो खेळण्याची शक्यता नाहीय. पुढच्या 2023 च्या सीजनमध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सकडून तुम्हाला खेळताना दिसू शकतो. अनेकांना जसप्रीत बुमराह आणि आर्चरला एकत्र गोलंदाजी करताना पहाण्याची इच्छा आहे. या दोघांसोबत सूर्यकुमार यादवही मुंबई संघात आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.