जीम मधली मस्करी महाग पडली, इंग्लंडचा प्रमुख खेळाडू पहिल्या टी 20 सामन्याला मुकणार, पहा VIDEO
क्रिकेटपटुंना (Cricket) अनेकदा दुखापती होतात. खेळाच्या मैदानात या दुखापती होतात. पण काही वेळा अंगाची मस्ती करताना दुखापत होते. ज्याबद्दल खेळाडूंना नंतर पश्चाताप होतो.
मुंबई: क्रिकेटपटुंना (Cricket) अनेकदा दुखापती होतात. खेळाच्या मैदानात या दुखापती होतात. पण काही वेळा अंगाची मस्ती करताना दुखापत होते. ज्याबद्दल खेळाडूंना नंतर पश्चाताप होतो. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो (jonny bairstow) बरोबर सुद्धा असंच झालं. इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जॉनी बेयरस्टोला मस्ती सुरु असताना दुखापत झाली. बेयरस्टो सहकारी खेळाडू सॅम करन (sam curran) सोबत जीम मध्ये मजा-मस्ती करत होता. त्याने सॅमला खांद्यावर उचलून घेतलं होतं. त्याचवेळी बेयरस्टोला दुखापत झाली. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात त्याचं खेळणं अवघड आहे.
जॉनी बेयरस्टोचा व्हिडिओ व्हायरल
जॉनी बेयरस्टोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात बेयरस्टोने सहकारी सॅमला खांद्यावर उचलून घेतलय. बेयरस्टो हे सर्व मस्करी मध्ये करत होता. पण अखेरीस त्याला दुखापत झाली. बेयरस्टोला सराव मध्येच सोडावा लागला. त्याच्या गुडघ्याना पट्टी बांधलेली होती. बेयरस्टोला चालताना त्रास होत होता. आता बेयरस्टोचं पहिल्या टी 20 मध्ये खेळणं अवघड आहे. यावर अजून कोणताही अंतिम निर्णय़ झालेला नाही.
Jonny Bairstow lifting Sam Curran ???
? IG: reecejtopley pic.twitter.com/HwVH7l6wVr
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) July 26, 2022
जॉनी बेयरस्टोची जबाबदारी फिल सॉल्ट निभावणार
इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन सामने खेळायचे आहेत अशा परिस्थितीत बेयरस्टो पहिल्या सामन्याला मुकू शकतो. त्यावेळी फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक मधल्याफळीत खेळतील. हे दोन्ही खेळाडू भारताविरुद्ध खेळले होते. बेयरस्टोला आराम देण्यात आला आहे.