T20 world Cup 2021: भारतीय संघाची घोषणा होताच इंग्लंडचा संघही जाहीर, बेन स्टोक्स नाहीच, पण तीन वर्षानंतर ‘या’ धाकड खेळाडूचे पुनरागमन

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारताने संघ जाहीर करताच इंग्लंड क्रिकेटने देखील आपले शिलेदार जाहीर केले आहेत. यामध्ये एक धाकड खेळाडू तब्बल तीन वर्षानंतर संघात पुनरागमन करत आहे.

T20 world Cup 2021: भारतीय संघाची घोषणा होताच इंग्लंडचा संघही जाहीर, बेन स्टोक्स नाहीच, पण तीन वर्षानंतर 'या' धाकड खेळाडूचे पुनरागमन
इंग्लंड 'टी-20 संघ
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 6:45 PM

लंडन : क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास बऱ्याच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले असून 8 सप्टेंबर रोजी भारताने आपला संघल जाहीर करताच आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) देखील आपल्या अंतिम 15 खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत.

इंग्लंडने जाहीर केलेल्या संघात सर्वच धुरंदर खेळाडू आहेत. मात्र इंग्लंड संघाला सर्वात मोठा तोटा हा त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) नसल्याने होणार आहे. तसंच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra archer) नसल्यानेही इंग्लंड संघ अडचणीत सापडू शकतो पण सुदैवाने त्यांचा एक धाकड गोलंदाज जो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्याचे पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू म्हणजे इंग्लंडचा टी-20 स्पेशलिस्ट टाइमल मिल्‍स (Tymal Mills).

टाइमल मिल्सचे पुनरागमन

इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी मिल्सला संघात पुन्हा स्थान देण्याबद्दल माहिती दिली. मिल्स दुखापतीमुळे काही काळ संघात नव्हता. पण अलीकडे टी-20 ब्लास्ट आणि द हण्ड्रेडमध्ये त्याने केलेल्या अप्रतिम खेळीमुळे त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात येत आहे.

कोण आहे टाइमल मिल्‍स?

टाइमल मिल्‍स हा 28 वर्षीय इंग्लिश क्रिकेटर (England Cricketer) आहे. मिल्स इंग्लंडच्या टी-20 स्कॉडमधील महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. मिल्स 2016 पासून इंग्लंड संघातून खेळत आहे. मात्र सतत दुखापतग्रस्त असल्याने मिल्स आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ :

इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, टाइमल मिल्स, आदिल राशिद, जेसन रॉय, डेविड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड

राखीव : टॉम करन, लियम डॉसन, जेम्स विन्स

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

(Just after indian announced team for t20 World cup England Cricket also announced their squad for the ICC Mens T20WorldCup)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.