IND vs ENG | अश्विन-बेयरस्टोनंतर आणखी दोन खेळाडूंच शतक, रचला नवीन इतिहास

IND vs ENG | धर्मशाळामध्ये रविचंद्रन अश्विन आणि जॉनी बेयरस्टो आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहेत. हा सामना गुरुवारी सुरु झाला होता. या टेस्टनंतर आणखी दोन खेळाडू आपली 100 वी कसोटी खेळत आहेत. क्रिकेट इतिहासात हे तिसऱ्यांदा घडलय.

IND vs ENG | अश्विन-बेयरस्टोनंतर आणखी दोन खेळाडूंच शतक, रचला नवीन इतिहास
Ashwin 100 th test match
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 11:43 AM

IND vs ENG | धर्मशाळा येथे भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु झाला आहे. भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोसाठी हा कसोटी सामना खूप खास आहे. कारण दोघांचा हा 100 वा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर आज म्हणजे दुसऱ्यादिवशी आणखी दोन खेळाडू टेस्ट करिअरमधला 100 वा सामना खेळले. भारत-इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. न्यूझीलंडचा केन विलियमसन आणि टिम साउदी यांच्या करिअरमधला हा 100 वा कसोटी सामना आहे.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 24 तासांच्या आत चार खेळाडूंनी करिअरमधील एक मोठा टप्पा गाठला आहे. चौघेही आपला 100 वा कसोटी सामना खेळतायत. चौघांचाही हा कसोटी सामना संस्मरणीय करण्याचा प्रयत्न असेल. साऊदी आणि विलियमसन दोघांचाही न्यूझीलंडच्या महान खेळाडूंमध्ये समावेश होतो. आपला 50 कसोटी सामनाही दोघे एकत्र खेळले होते. आता 100 व्या कसोटीतही एकत्र आहेत.

या गोलंदाजाचे तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 सामने

याआधी इंग्लंडचा एलेक स्टिवर्ट आणि माइक आथरटन वेस्ट इंडिज विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळले होते. त्यानंतर 2006 साली सेंच्युरियनमध्ये जॅक कॅलिस आणि शॉन पॉलक एकत्र 100 वा कसोटी सामना खेळले होते. आता या लिस्टमध्ये विलियमसन आणि साउदी यांचा समावेश झाला आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये 100-100 सामने खेळणारा साऊदी पहिला गोलंदाज आहे.

अश्विनचीच खास कामगिरी

अश्विनने 100 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने चार फलंदाजांना बाद केलं. जॉनी बेयरस्टो काही खास करु शकला नाही. तो पहिल्या इनिंगमध्ये 29 रन्सवर आऊट झाला. विलियमसन सुद्धा 100 व्या कसोटीत काही खास करु शकला नाही. तो 17 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.