T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

यंदाच्या टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं. न्यूझीलंडला आठ विकेट्सने नमवत ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी खिशात घातली. असे असले तरी ऑस्ट्रेलियाच्या एका चुकीची सगळीकडे चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जॉश हेजलवूडने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा झेल सोडला. याच एका चुकीमुळे नंतर केनने फक्त 48 धावांत तब्बल 85 धावा केल्या.

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा
ken williamson
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:10 AM

दुबई : यंदाच्या टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं. न्यूझीलंडला आठ विकेट्सने नमवत ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी खिशात घातली. असे असले तरी ऑस्ट्रेलियाच्या एका चुकीची सगळीकडे चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जॉश हेजलवूडने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा झेल सोडला. याच एका चुकीमुळे नंतर केनने फक्त 48 चेंडूत तब्बल 85 धावा केल्या. केनच्या या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळाले होते. तर दुसरीकडे केनने 85 धावसंख्या करुन नवे रेकॉर्ड बनवले.

केनने 48 चेंडूत 85 धावा केल्या

सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजी निवडली. फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी साधारण प्रदर्शन केले. मात्र एकट्या विल्यमसनने न्यूझीलंडचा संपूर्ण डाव सांभाळला. त्यांने 48 चेंडूत 85 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. केनच्या या खेळीमुळे न्यूझीलंडच्या संघाला 172 धावा काढता आल्या. याआधी 11 वे षटक सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेजलवुडने केनचा झेल सोडला. हा झेल जर यशस्वीरित्या पकडता आला असता तर केन एवढ्या साऱ्या धावा करुच शकला नसता.

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या एका चुकीची चर्चा 

या एका चुकीमुळे न्यूझीलंडच्या संघाला 172 धावांपर्यत मजल मारता आली. यामध्ये एकट्या केनच्या तब्बल 85 धावा आहेत. केनने आपल्या खेळात 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या या एका चुकीचा म्हणजेच केनचा झेल सोडलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

संधी मिळताच केले नवे रेकॉर्ड

केनने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने तब्बल 85 धावा केल्या. टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या असून त्याने मार्लोन सॅम्युअल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सॅम्युअल्सने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 85 धावांची खेळी करून वेस्ट इंडिजला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ऑस्ट्रेलिया विजयी, न्यूझीलंडचा पराभव

दरम्यान, टी20 विश्वचषक 2021 ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. तसेच 173 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहजच पार केलं. यामध्ये यावेळी डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर सर्वाधिक धावा मिशेल मार्शने केल्या. त्याने 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

इतर बातम्या :

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

‘देशद्रोही ठरवा, नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत कंगनाला देशात स्थान नको,’ बड्या मंत्र्याचे वक्तव्य

100 नक्षल्यांशी सामना, 26 जणांना कंठस्नान, गडचिरोलीच्या जंगलात नेमकं ऑपरेशन कसं राबवलं गेलं?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.