IND vs NZ : मुंबई कसोटीआधी न्यूझीलंडला मोठा धक्का, कर्णधार विलियम्सन बाहेर
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पावसामुळे लांबणीवर पडला आहे. दोन्ही संघांसाठी ही चांगली बातमी नाही. पण यादरम्यान टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पावसामुळे लांबणीवर पडला आहे. दोन्ही संघांसाठी ही चांगली बातमी नाही. पण यादरम्यान टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या कोपराला झालेली दुखापत. किवी संघाशी संबधित अधिकाऱ्याने विल्यमसन मुंबई कसोटीत खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे. त्याच्या जागी टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल, असेही त्यांनी सांगितले. (Kane Williamson ruled out 2nd Test between India vs lead New Zealand, Tom Latham to kiwi team)
विल्यमसनच्या कोपराची दुखापत त्याला बराच काळ सतावत होती आणि त्यामुळे मुंबई कसोटीपूर्वी किवी कर्णधार पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ जारी करताना प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “दुर्दैवाने केन या सामन्यात खेळू शकणार नाही. केनच्या कोपराला काही महिन्यांपूर्वी दुखापत झाली होती, तो त्यातून सावरला होता, मात्र कानपूर कसोटीच्या वेळी त्याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. त्यामुळे आम्हाला त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याला थोडी विश्रांती द्यावी आणि दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ द्यावा, असा विचार टीम मॅनेजमेंटने केला. केन या सामन्यात खेळत नाही हे दुःखद आहे.”
Team News | BLACKCAPS captain Kane Williamson will miss the second and final Test against India in Mumbai as he continues to battle the left-elbow injury which has troubled him for much of 2021. More | https://t.co/VClIKxKI8Q #INDvNZ pic.twitter.com/wGeA46LN4g
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 3, 2021
केनसाठी चांगलं प्लॅनिंग करण्याची गरज
प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “केनसाठी हा खूप कठीण काळ होता. या दुखापतीशी तो सातत्याने झुंज देत आहे. त्याची दुखापत आम्ही वर्षभर हाताळत आहोत. टी-20 विश्वचषक, त्यानंतर कसोटी क्रिकेट, यामुळे त्याच्या फलंदाजीवरचं प्रेशर वाढलं आणि कोपराच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. तशाच अवस्थेत तो कानपूर कसोटीसाठी मैदानात उतरला होता. कानपूर कसोटीत तो खेळला पण दुसऱ्या कसोटीत खेळणे मुश्किल होते. त्यामुळे विश्रांती घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. दुखापतीशी झगडणाऱ्या केनसाठी हे वर्ष आव्हानात्मक राहिले आहे. त्याच्यासाठी चांगला प्लॅन तयार करणे आणि या दुखापतीचा त्याला पुन्हा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”
भारतासाठी दिलासादायक बातमी
विल्यमसनच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळते, हे नाणेफेक झाल्यानंतर कळेल पण भारतासाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. केन विल्यमसनची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते आणि त्याने भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले असते. आता तो नसेल तर भारताचं काम आणखी सोपं होईल.
इतर बातम्या
IND vs NZ : पहिली टेस्ट ड्रॉ, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट, टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
(Kane Williamson ruled out 2nd Test between India vs lead New Zealand, Tom Latham to kiwi team)