भारत WTC फायनल सामन्यात पराभूत, विल्यमसन म्हणतो, ‘भारतीयांनो तुम्ही महान, एका मॅचमधून सगळंच कळत नसतं!’

"भारतीय संघ WTC च्या अंतिम सामन्यात जरुर हरला असेल पण एका मॅचमधून विराट कोहलीची टीम इंडिया किती मजबूत आहे, याचं चित्र स्पष्ट होत नाही. भारतीय खेळाडू महान आणि दिग्गज आहेत. जिंकायचं कसं हे त्यांना चांगलंच माहिती आहे", असं विल्यमसन म्हणाला. (Kane Williamson WTC Final 2021)

भारत WTC फायनल सामन्यात पराभूत, विल्यमसन म्हणतो, 'भारतीयांनो तुम्ही महान, एका मॅचमधून सगळंच कळत नसतं!'
केन विल्यमसन आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:40 AM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) किवी संघाने भारतीय संघाचा (India vs New Zealand) 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला. पराभवानंतर भारतीय संघाचं ‘चुकलं कुठं?’, याची कारणमिमांसा होत आहे. आता थेट न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) भारतीय संघाच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरला आहे. “भारतीय संघ एक महान संघ आहे. संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मॅच जरुर महत्त्वाची होती, पण एका मॅचमुळे काही सगळंच चित्र स्पष्ट होत नाही”, असं म्हणत विल्यमसनने भारतीय संघाच्या आक्रमकपणाचं, खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं. (Kane Williamson Statement on ICC WTC Final 2021 India vs New Zealand)

“भारतीय संघ WTC च्या अंतिम सामन्यात जरुर हरला असेल पण एका मॅचमधून विराट कोहलीची टीम इंडिया किती मजबूत आहे, याचं चित्र स्पष्ट होत नाही. भारतीय खेळाडू महान आणि दिग्गज आहेत. जिंकायचं कसं हे त्यांना चांगलंच माहिती आहे”, असं विल्यमसन म्हणाला.

पाऊस आणि अंधूक प्रकाशाचा व्यत्यय सामन्यात वेळोवेळी येत राहिला. तरीही अवघ्या तीन ते सव्वा तीन दिवसांत सामन्याला निकाल किवी संघाने लावला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी किवींनी भारतीय संघाचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. जवळपास 20 वर्षांनी किवींनी आयसीसी करंडक उंचावला.

टीम इंडिया मजबूत आणि तगडी

केन विल्यमनसने WTC विजयानंतर इंडिया टुडे चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय संघाचं कौतुक केलं. तो म्हणाला, “विश्वचषकाची फायनल मॅच म्हणजे नक्कीच रोमांच उभी करणारी मॅच… या मॅचमध्ये आम्ही जिंकलो, याचा आनंद नक्कीच मोठा आहे. परंतु पराभूत झालेली भारतीय टीम देखील तितकीच मजबूत आणि तगडी आहे. कधी कधी एका मॅचमधून सगळंच चित्र स्पष्ट होत नाही. संघ आणि संघातील खेळाडूंचं टॅलेंट दिसत नाही.”

भारताच्या वेगवान गोलंदाजीची तारीफ

“भारतीय संघाने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मॅचेसमध्ये विजय मिळवलेत, इथून पुढेही मिळवतील. तुम्ही भारतीय संघाच्या क्वालिटीबद्दल जाणता… भारतीय संघात एका वेगवान गोलंदजांचा भरणा आहे जो जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट मानला जातो. भारतीय संघाजवळ फिरकी गोलंदाजी अविश्वसनीय आहे आणि फलंदाजांची डेप्थ देखील अप्रतिम आहे”, असं विल्यमसन म्हणाला.

(Kane Williamson Statement on ICC WTC Final 2021 India vs New Zealand)

हे ही वाचा :

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल….

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर

पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.