Kaviya maran यांची दक्षिण आफ्रिकेत चर्चा, सौंदर्यावर भाळला, थेट लग्नाची घातली मागणी
सौंदर्य, बुद्धीमत्ता यामुळे या महिला अँकर्सचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. क्रिकेटमध्ये अशाच एका तरुणीची नेहमी आयपीएलच्यावेळी चर्चा होते. ती थेट मैदानावर उतरुन कोणाचा इंटरव्यू घेत नाही.
डरबन: क्रिकेटविश्वात फक्त क्रिकेटर्सची नव्हे, तर सौंदर्यवतींची सुद्धा चर्चा होते. आज अनेक महिला स्पोर्ट्स अँकर्स सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. सौंदर्य, बुद्धीमत्ता यामुळे या महिला अँकर्सचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. क्रिकेटमध्ये अशाच एका तरुणीची नेहमी आयपीएलच्यावेळी चर्चा होते. ती थेट मैदानावर उतरुन कोणाचा इंटरव्यू घेत नाही. पण टीमची रणनिती आखण्यात तिचा सहभाग असतो. मैदानावरील तिची उपस्थिती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. या तरुणीच नाव आहे काव्या मारन. भारताता काव्या मारनच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. पण आता दक्षिण आफ्रिकेतही काव्या मारनच्या चाहत्यांची संख्या वाढतेय.
थेट लग्नाची मागणी
दक्षिण आफ्रिकेतील एका चाहत्याने, तर थेट काव्या मारनला लग्नाची मागणी घातली आहे. IPL मधील सनराजयर्स हैदराबाद संघाचे मालकी हक्क काव्या मारनकडे आहेत. आता दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 लीगमध्येही काव्या मारन यांनी टीम विकत घेतलीय. आयपीएलच्या एकूण 6 फ्रेंचायजींनी दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये टीम विकत घेतल्या आहेत. SA 20 लीगमध्ये सनरायजर्स ईस्टर्न कॅपचा सामना 19 जानेवारीला पार्ल रॉयल्ससोबत होता. काव्या मारन हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती.
सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं
पार्ल रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स ईस्टर्न कॅपचा सामना पाहण्यासाठी काव्या मारन उपस्थित होती. पार्ल रॉयल्सने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांच्या इनिंगच्या 8 ओव्हर पूर्ण झाल्या होत्या. त्यावेळी कॅमेऱ्यावर एक पोस्टर दिसला. ज्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.
Looks like someone needs a bit of help from @Codi_Yusuf on how to propose in the BOLAND. ?#Betway #SA20 | @Betway_India pic.twitter.com/ZntTIImfau
— Betway SA20 (@SA20_League) January 19, 2023
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दक्षिण आफ्रिकेतही काव्या मारनची जादू दिसून येतेय. कॅमेऱ्याने काव्या मारन यांना दाखवल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढत चाललीय. दक्षिण आफ्रिकेत एका चाहत्याने हातात पोस्टर धरुन थेट काव्या मारन यांना लग्नाची मागणी घातली. काव्यामारनच्या दक्षिण आफ्रिकेतील या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काव्या मारनप्रमाणे तिच्या टीमनेही सामना जिंकला. पार्ल रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स ईस्टर्न कॅपने 10 चेंडू आणि 5 विकेट राखून विजय मिळवला.