Heinrich Klaasen century : टीम हरली पण ‘ती’ हसली, पाहा तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव
Heinrich Klaasen century : खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर हसू दिसलं. आयपीएल 2023 चा सीजन सुरु झाला की, ती नेहमी चर्चेत येते. तिच्या अदांनी सोशल मीडिया व्यापून टाकते. टीमसाठी तिचे प्रत्येक भाव कॅमेऱ्यात टिपले जातात.
हैदराबाद : IPL 2023 मध्ये काल 65 वा सामना खेळला गेला. सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये ही मॅच झाली. प्लेऑफच समीकरण लक्षात घेता, RCB साठी ही मॅच खूप महत्वाची होती. कारण या विजयामुळे त्यांच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग सुकर होणार होता. काल घडलं सुद्धा तसंच. RCB ने सनरायजर्स हैदराबादवर आरामात विजय मिळवला. SRH ने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. RCB ने 2 विकेटच्या मोबदल्यात 19.2 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य आरामात पार केलं.
या सामन्यानंतर विराट कोहलीच्या सेंच्युरीची चर्चा होत असली, तरी हेनरिक क्लासेन सुद्धा क्लास इनिंग खेळला. त्याने 51 चेंडूत 104 धावा फटकावल्या. यात 8 फोर आणि 6 सिक्स होते.
लॉन्ग ऑनच्या भागात लॉफ्टेड फटका
हेनरिक क्लासेनची आयपीएलमधली ही पहिली सेंच्युरी आहे. हर्षल पटेलने 19 वी ओव्हर टाकली. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर क्लासेनने लॉन्ग ऑनच्या भागात लॉफ्टेड फटका मारला व सेंच्युरी पूर्ण केली. या सामन्याचा निकाल हैदराबाद टीमसाठी काही खास महत्वाचा नव्हता. कारण आधीच त्यांचं चालू सीजनमधील आव्हान संपुष्टात आलय.
डोळ्यात आनंद
हेनरिक क्लासेनच्या या सेंच्युरीने टीमची मालकीण काव्या मारनच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तिच्या डोळ्यात आनंद आणि चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. हेनरिक क्लासेन हे शतकही हैदराबादचा पराभव टाळू शकलं नाही.
विराट इनिंगसमोर हैदराबादची हार
ओपनिंगला आलेल्या विराट कोहलीने काल जबरदस्त खेळ दाखवला. त्याने 63 चेंडूत 100 धावा केल्या. यात 12 फोर आणि 4 सिक्स होते. कोहलीच्या या विराट इनिंगसमोर हैदराबादचा निभाव लागला नाही. RCB ने 8 विकेट्सनी ही मॅच जिंकली.