Kavaya Maran : काव्या मारन ‘या’ खेळाडूंना SRH मधून करणार बाहेर, हा फायनलमधील पराभवाचा राग आहे का?
Kavaya Maran : सनरायजर्स हैदराबादची टीम तिसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळली. पण दुसऱ्यांदा किताब जिंकता आला नाही. आयपीएलचा 17 वा सीजन संपला आहे. पुढच्या सीजनमध्ये SRH टीममधून काही खेळाडू बाहेर होऊ शकतात. काव्या मारन का असा निर्णय घेणार जाणून घेऊया.
सनरायजर्स हैदराबादमधून काही खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. टीमची मालकीण काव्या मारन आपल्या अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. तुम्ही विचार करत असाल, हे सगळं आम्ही इतक्या विश्वासाने कसं बोलतोय? हा आमचा विश्वास नाही, फक्त अंदाज आहे. अंदाज यासाठी कारण IPL 2024 चा सीजन संपलाय. पुढच्या आयपीएलआधी मेगा ऑक्शन होणार आहे. यात फक्त SRH च नाही, बहुतांश खेळाडूंना रिलीज कराव लागणार आहे. म्हणजे फार कमी खेळाडू रिटेन होतील.
IPL 2024 मध्ये जे व्हायच होतं, ते होऊन गेलं. SRH ने मागच्या 3-4 सीजनच्या तुलनेत या सीजनमध्ये चांगलं प्रदर्शन केलय. ते यंदाच्या आयपीएलमध्ये उपविजेते ठरले. भले किताब जिंकता आला नसेल, पण काव्या मारनला याचा गर्व असेल की, माझी टीम फायनलमध्ये खेळली. त्याशिवाय सगळ्याच टीम्स IPL 2025 मध्ये रणनिती बनवण्याच्या मागे लागतील. त्याची सुरुवात खेळाडूंच रिटेंशन आणि रिलीजपासून होईल.
SRH मधून कुठले खेळाडू रिलीज होतील?
सनरायजर्स हैदराबादच्या टीममधून काही खेळाडू बाहेर गेले, तर ते IPL 2024 च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामुळे नाही, तर आयपीएल 2025 च मेगा ऑक्शन लक्षात घेऊन होईल. आता प्रश्न हा आहे की, SRH कुठल्या प्लेयर्सना IPL 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी सोडणार. अशा खेळाडूंमध्ये सर्वात पहिलं नाव अब्दुल समदच आहे. त्याच्यावर काव्या मारनने भरपूर इन्वेस्ट केलय पण रिर्टन तसं मिळालं नाही. त्याशिवाय मयंक अग्रवाल, वॉशिंगटन सुंदर, आकाशदीप, जयदेव उनाडकट, अनमोलप्रीत सिंह सारख्या खेळाडूंना टीममधून रिलीज केलं जाऊ शकतं.
परदेशी खेळाडूंमध्ये कोण रिलीज होईल?
परदेशी खेळाडूंमध्ये कॅप्टन पॅट कमिन्सच SRH च्या बाहेर जाऊ शकतो. कारण पुढच्या सीजनमध्ये त्याच्या खेळण्याबद्दलच साशंकता असेल. ट्रेविस हेड सोबत सुद्धा असच होऊ शकतं. त्याशिवाय मार्को यानसन, ग्लेन फिलिप्स, ऐडन मारक्रम रिलीज होऊ शकतात.
रिटेन कोणाला करणार?
अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि हेनरिक क्लासेन या खेळाडूंना SRH IPL 2025 च्या सीजनसाठी रिटेन करु शकते.