IPL 2022: Mumbai Indians जिंकली, पण रोहित शर्माचा मोठा मॅच विनर हरला, त्याचं संघाबाहेर जाणं निश्चित

IPL 2022: टिम डेविडने दमदार प्रदर्शन केलं. गोलंदाजीत डॅनियल सॅम्सने आपला जलवा दाखवला. या विजयात एक खेळाडू मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरला.

IPL 2022: Mumbai Indians जिंकली, पण रोहित शर्माचा मोठा मॅच विनर हरला, त्याचं संघाबाहेर जाणं निश्चित
Mumbai Indians Image Credit source: Mumbai Indians
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:17 PM

मुंबई: IPL 2022 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला 5 धावांनी हरवलं. मुंबई इंडियन्सच्या या दुसऱ्या विजयात इशान किशन, रोहित शर्मा (Rohit sharma) आणि टिम डेविड यांनी दमदार प्रदर्शन केलं. गोलंदाजीत डॅनियल सॅम्सने आपला जलवा दाखवला. या विजयात एक खेळाडू मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरला. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून, कायरन पोलार्ड आहे. कायरन पोलार्डचा खराब फॉर्म संपतच नाहीय. आता प्लेइंग इलेवनमधील त्याची जागा सुद्धा धोक्यात आहे. पोलार्डने काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 14 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. पोलार्डला राशिद खानने बोल्ड केलं. पोलार्डचं लेग स्पिनरसमोर फेल होणं, अजिबात नवीन नाहीय. मागच्या काही काळापासून फ्रेंचायजी असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेग स्पिनर्सनी पोलार्डला खूप त्रास दिलाय. गुजरात विरुद्ध सुद्धा हेच घडलं.

पोलार्डचा स्ट्राइक रेट आहे फक्त….

कायरन पोलार्डची बॅट आयपीएल 2022 मध्ये तशी शांतच आहे. पोलार्डने 10 सामन्यात फक्त 129 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 14.33 आहे. पोलार्डचा स्ट्राइक रेट 110 पेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे पोलार्डची सर्वाधिक धावसंख्या फक्त 25 आहे. कायरन पोलार्डची सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्याच्यासारखीच फलंदाजी करणारा टिम डेविड दमदार प्रदर्शन करतोय.

त्याच्यासारखाच खेळणार डेविड चमकतोय

टिम डेविडने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 21 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. यात चार षटकार आणि दोन चौकार होते. लखनौ विरुद्ध सुद्धा डेविडने दमदार कामगिरी करुन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.