IPL 2021 सुरु होण्यापूर्वी पोलार्डचा जलवा, 22 चेंडूत संपवला 20 षटकांचा सामना, 232 चा स्ट्राईक रेट

मुंबई इंडियन्स संघाचा उपकर्णधार आणि सर्वांचाच आवडता धडाकेबाज खेळाडू कायरन पोलार्ड आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सीपीएलमध्ये आपली धडाकेबाज खेळी दाखवत आहे.

IPL 2021 सुरु होण्यापूर्वी पोलार्डचा जलवा, 22 चेंडूत संपवला 20 षटकांचा सामना, 232 चा स्ट्राईक रेट
कायरन पोलार्ड
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 1:56 PM

मुंबई: रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) थेट वेस्ट इंडिजमधून एक खुशखबर आली आहे.  आयपीएल (IPL 2021) सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा उपकर्णधार आणि सर्वात दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) वेस्ट इंडिजच्या सीपीएल (CPL 2021) स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत आहे. त्याने 20 ओव्हरमध्ये 22 चेंडूच खेळला पण तेवढ्याच वेळात त्याने तब्बल 231.80 च्या स्ट्राइक रेटने अर्धशतक ठोकलं. पोलार्डने ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाला पराभूत केलं.

सामन्यात पहिल्यांदा पॅट्रियट्स संघाने फलंदाजी केली होती. त्यांनी 20 षटकांत 7 विकेटच्या बदल्यात 147 धावा केल्या. पॅट्रियट्स संघाकडून सर्वाधिक धावा जोशुआ डि सिल्वाने केल्या. त्याने 45 चेंडूत 50 धावा केल्या, तर रुदरफोर्ड आणि ब्रावोने प्रत्येकी 25 धावा केल्या. ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून अली खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

पोलार्डची कर्णधारी खेळी

ट्रिनबागो नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी 20 ओव्हरमध्ये 148 धावांची गरज होती. पण 52 धावांवरच त्याचे टॉपचे 3 फलंदाज तंबूत परतले. पण त्यानंतरच खरा रोमांचक खेळ सुरु झाला. संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड फलंदाजीला आला आणि त्याने धमाकेदार खेळी करण्यास सुरुवात केली. त्याने 32 मिनिटांत 22 चेंडूचा सामना केला. यामध्ये त्याने 232 च्या स्ट्राइक रेटने 5 षटकार आणि 3 चौकार ठोकत 51 धावा केल्या. यातील 42 धावा तर त्याने केवळ चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने केल्या. त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले ज्यानंतर खालच्या फलंदाजांनी विजय पक्का करत संघाला यश मिळवून दिलं.

आयपीएलसाठी सर्व सज्ज

मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मध्येच थांबवण्यात आलेली आयपीएल (IPL 2021) यंदा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी सांगितले. त्यानंतर आधी सामने सुरु होण्याची तारीख आणि ठिकाण सांगण्यात आले. स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग या दिग्गज संघात होणार आहे. या उर्वरीत पर्वात एकूण 31 सामने खेळवले जातील.

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(Kieron pollard smashing runs at CPL before ipl he helped tkr to win)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.