KK Passes Away: ‘हम हैं इंडिया’, वर्ल्ड कप आधी KK ने टीम इंडियात भरला होता जोश
KK Passes Away: केके यांचं संपूर्ण नाव आहे, कृष्ण कुमार कुन्नत. 1999 वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी केके यांचा करीयर उभारण्यासाठी संघर्ष सुरु होता.
मुंबई: प्रसिद्ध गायक KK यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. केके संगीत विश्वातील एक मोठं नाव होतं. केके यांचे भारताप्रमाणे देश-विदेशात मोठे चाहते होते. केके यांचा जादुई आवाज थेट मनाला भिडायचा. त्यांनी गायलेली रोमँटिक, ब्रेक अप साँग आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. याच केके यांनी भारतीय क्रिकेट संघातही आपल्या आवाजाने जोश भरला होता. 1999 वर्ल्ड कप आधी केके यांनी मोहम्मद अझरुद्दीनच्या (mohammad azharuddin) भारतीय संघासाठी ‘हम हैं इंडिया’ (Hum Hai India) हे जोश निर्माण करणार गाणं गायलं होतं. 1999 वर्ल्ड कपसाठी ‘हम हैं इंडिया’ हे भारतीय क्रिकेट संघाचं थीम साँग होतं. याच गाण्याने अझर आणि कंपनीमध्ये जोश भरण्याचं काम केलं होतं. जोश वाला डायलॉग आता लोकप्रिय आहे. पण सिंगर केकेने आपल्या जादुई आवाजाने हा जोश टीम इंडियात आधीच भरला होता. केके यांनी ‘हम हैं इंडिया, हम हैं इंडिया….जोश ऑफ इंडिया’ हे गाणं गायलं. त्या माध्यमातून 1999 साली वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीम इंडियाला तुमच्यात जिंकण्याची शक्ती आहे याची जाणीव करुन दिली होती.
Deeply saddened by the passing of KK. Condolences to his family and friends. ??
— Anil Kumble (@anilkumble1074) June 1, 2022
Tragic to hear about the passing away of KK after falling ill while performing in Kolkata. Another reminder of how fragile life is. Condolences to his family and friends. Om Shanti. pic.twitter.com/43B3dzykP3
— Virender Sehwag (@virendersehwag) May 31, 2022
ओळख बनवण्याचं आव्हान
केके यांचं संपूर्ण नाव आहे, कृष्ण कुमार कुन्नत. 1999 वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी केके यांचा करीयर उभारण्यासाठी संघर्ष सुरु होता. कुमार सानू, उदित नारायण, अभिजीत, सुखविंदर, या गायकांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणं, हे केके समोरचं मुख्य आव्हान होतं. जाहीराती, सीरियल, आणि दुसऱ्या भाषांच्ंया चित्रपटांमध्ये आवाज देऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
KK ने एकापेक्षा एक सरस गाणी गायली
बॉलिवूडमधील सलमान खान-ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं तडप, तडपकर गाणं गायला मिळालं, तिथून केके यांचं नशीब पालटलं. त्यांनी मागे वळून बघितलं नाही. ‘पल’ या म्यूझिक अल्बममधून केके यांनी आपल्या सिंगिंग करीयरची सुरुवात केली. केकेने आपल्या करियरमध्ये ऐकापेक्षा एक पॉप्युलर गाणी गायली. भारतीय क्रिकेटमध्ये केकेचे अनेक मित्र होते. ज्यांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.