KKR New Captain of IPL 2022: केकेआरची मोठी घोषणा, मुंबईचा मुलगा झाला कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन

KKR New Captain Shreyas Iyer: IPL 2022 च्या सीजनसाठी कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.

KKR New Captain of IPL 2022: केकेआरची मोठी घोषणा, मुंबईचा मुलगा झाला कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन
Kolkata Knight Riders TeamImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:53 PM

कोलकाता: IPL 2022 च्या सीजनसाठी कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. KKR ने भारताचा मधल्याफळीतील फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरची (shreyas iyer) कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदी निवड केली आहे. मेगा ऑक्शन संपल्यानंतर तिसऱ्याचदिवशी KKR ने कॅप्टनच्या नावाची घोषणा केली आहे. KKR ने टि्वट करुन श्रेयस अय्यरसची संघाच्या कर्णधारपदी निवड करत असल्याचे जाहीर केले आहे. श्रेयस अय्यर इंग्लंडच्या इयन मॉर्गनची जागा घेणार आहे. मॉर्गन कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन होता. त्याने मागच्या सीजनमध्ये KKR ला फायनलपर्यंत पोहोचवले होते. फलंदाजीत अपयशी ठरल्यामुळे कोलकाताने मॉर्गनला रिटेन केलं नाही व यावेळच्या लिलावात विकतही घेतलं नाही. KKR नव्या कर्णधाराच्या शोधात होती. त्यांनी श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी मोठी रक्कमही खर्च केली.

श्रेयस अय्यर मागच्या सीजनपर्यंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. 2018 चा सीजन सुरु असताना मध्येच दिल्ली कॅपिटल्सने त्याला कर्णधार बनवले होते. 2020 च्या सीजनमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ फायनलपर्यंत पोहोचला. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ पहिल्यांदा फायनलपर्यंत पोहोचला होता. मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.

म्हणून श्रेयसने दिल्लीचा संघ सोडला 2021 च्या सीजनआधी श्रेयस दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे स्पर्धेचे पहिले सत्र तो खेळू शकला नाही. त्यावेळी दिल्लीच्या ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफ पर्यंत पोहोचला. दिल्लीने त्यानंतर ऋषभ पंतलाच कर्णधारपदी कायम ठेवले. त्यामुळे श्रेयस अय्यरने दिल्लीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला ताफ्यात घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसली. अखेर KKR ने बाजी मारली. कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपये मोजून श्रेयसला विकत घेतलं. KKR च्या 14 वर्षाच्या इतिहासातील सहावा कॅप्टन आहे. फ्रेंचायजीचा सर्वात पहिला कॅप्टन सौरव गांगुली होता. त्यानंतर ब्रँडन मॅक्कलमने ही जबाबदारी संभाळली. त्यानंतर गौतम गंभीर बराचकाळ केकेआरचा कॅप्टन होता.

kkr appoint shreyas iyer new captain ipl 2022 kolkata knight riders announcement

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.