IPL 2023 : Shubman Gill ला रिटेन न करण्याच्या मुद्यावर KKR चे सीईओ वैंकी मैसूर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

IPL 2023 : Shubman Gill ला KKR ने का रिटेन केलं नाही? KKR चे सीईओ वैंकी मैसूर पहिल्यांदाच रिटेन न केलेल्या खेळाडूंच्या विषयावर स्पष्टपणे व्यक्त झाले आहेत. त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

IPL 2023 : Shubman Gill ला रिटेन न करण्याच्या मुद्यावर KKR चे सीईओ वैंकी मैसूर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
IPL 2023 shubman gillImage Credit source: BCCI/PTI
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 12:02 PM

कोलकाता : IPL 2023 चा सीजन दुसऱ्या टप्प्यात आला आहे. शुभमन गिल, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे आणि पियुष चावला हे कोलकाता नाइट रायडर्सचे माजी खेळाडू. चालू सीजनमध्ये कोलकाताकडून खेळलेले हे माजी प्लेयर जबरदस्त कामगिरी करतायत. 2022 च्या मेगा ऑक्शनवेळी अन्य फ्रेंचायजींप्रमाणे केकेआरला सुद्धा अनेक खेळाडूंना रिलीज कराव लागलं. केकेआरला फक्त 4 प्लेयर रिटेन करण्याची परवानगी होती.

शुभमन गिल सध्या गुजरात टायटन्स आणि अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्सकडून जबरदस्त खेळ दाखवतायत. अजिंक्यने, तर स्वबळावर चेन्नईला सामने जिंकून दिलेत. मागच्या सीजनपर्यंत अजिंक्य रहाणे केकेआरच्या टीममध्ये होता. पण तिथे त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

शुभमनच्या मुद्दावर केकेआरचे CEO काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

शुभमन गिलच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. केकेआरने त्याला रिटेन केलं नाही. या मुद्यावर आता केकेआरचे CEO वैंकी मैसूर बोलले आहेत. “काही दर्जेदार खेळाडूंना गमावल्याची आपल्याला खंत नाहीय. त्यावेळी जी माहिती उपलब्ध होती, त्या आधारावर खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला” असं वैंकी मैसूर म्हणाले. “आम्ही घडवलेले चांगले खेळाडू आज दुसऱ्या फ्रेंचायजीकडे जाऊन चांगले खेळतायत, हे पाहून बरं वाटतं. शुभमन गिल एक चांगलं उदहारण आहे” असं वैंकी मैसूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

चालू सीजनमध्ये शुभमनने किती धावा केल्या?

मागच्या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये शुभमन गिल होता. 2022 च्या सीजनमध्ये शुभमन गिलने 483 धावा केल्या होत्या. आता चालू सीजनमध्ये 8 इनिंग्समध्ये त्याने 333 रन्स केल्या आहेत. गिलप्रमाणेच कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स), पियुष चावला (मुंबई इंडियन्स) चांगला खेळ दाखवतायत. धोनीच्या नेतृत्वाची जादू

अजिंक्य रहाणेला मागच्या सीजनमध्ये केकेआरकडून मर्यादीत संधी मिळाल्या होत्या. आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याच्यात अमूलाग्र बदल झालाय. धोनीच्या नेतृत्वाची जादू त्याच्या खेळात दिसून येतेय. सध्याच्या सीजनमधील परफ़ॉर्मन्समुळेच तब्बल वर्षभरानंतर त्याला भारतीय टेस्ट टीममध्ये स्थान मिळालय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये अजिंक्य रहाणेची निवड झालीय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.