Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिकच्या कॅप्टनशिपवर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना गंभीरने धुतलं, या दोन दिग्गजांना ठरवलं सर्वात खराब कॅप्टन

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या खराब प्रदर्शनामुळे हार्दिक पांड्या सर्वांच्या रडारवर आहे. हार्दिकवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. त्याला भरपूर सुनावल जातय. या कठीण काळात दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर हार्दिकच्या पाठिशी उभा राहिला आहे. हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Hardik Pandya : हार्दिकच्या कॅप्टनशिपवर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना गंभीरने धुतलं, या दोन दिग्गजांना ठरवलं सर्वात खराब कॅप्टन
Gautam Gambhir-Rohit SharmaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 9:27 AM

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागलाय. पण कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर हार्दिकच्या पाठिशी उभा राहिलाय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने खराब प्रदर्शन केलं, हे गौतम गंभीरला मान्य आहे. पण त्याला अजून संधी मिळाली पाहिजे. हार्दिकच्या टीकाकारांवर गौतम गंभीरने निशाणा साधला. एबी डिविलियर्स आणि केविन पीटरसन हे दिग्गज खेळाडू खराब कॅप्टन असल्याच गंभीर म्हणाला. अलीकडेच पीटरसन आणि डिविलियर्सने पांड्याच्या नेतृत्वातील त्रुटी उघड केल्या होत्या.

गौतम गंभीर एका मुलाखतीत म्हणाला की, “हार्दिक पांड्या दुसऱ्या फ्रेंचायजीमधून मुंबई टीममध्ये आलाय. त्याला सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. त्याला वेळ द्यावा लागेल. जर, तुम्ही त्याच्याकडून अचानक चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा कराल, तर ते चुकीच आहे. त्याला थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक मॅचमध्ये त्याला जज करण्याची आवश्यकता नाहीय”

‘त्यांचं प्रदर्शन कुठल्याही कॅप्टनपेक्षा खराब’

“जे एक्सपर्ट्स हार्दिकवर टीका करतायत, त्यांनी कॅप्टन म्हणून आपला परफॉर्मन्स बघितला पाहिजे. मग, तो एबी डिविलियर्स असो किंवा केविन पीटरसन. त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं प्रदर्शन झालं, असं मला वाटत नाही. तुम्ही त्यांचे रेकॉर्ड्स पाहिले, तर त्यांचं प्रदर्शन कुठल्याही कॅप्टनपेक्षा खराब आहे” असं गौतम गंभीर म्हणाला.

‘म्हणून त्या बद्दल सगळे बोलतायत’

“एक्सपर्ट्स काय बोलतात, हे महत्त्वाच नाहीय. काही ना काही बोलणं हे त्यांचं काम आहे. जर, मुंबईने चांगलं प्रदर्शन केलं असतं, तर त्यांनी हार्दिकच कौतुक केलं असतं. पुढच्यावर्षी सुद्धा असं झालं, तर एक्सपर्ट्सच काही वेगळं म्हणणं असेल. एकूण परफॉर्मन्सचा विषय आहे. मुंबईने चांगलं प्रदर्शन केलं नाही, म्हणून त्या बद्दल सगळे बोलतायत” असं गौतम गंभीर म्हणाला.

उलट प्रत्येक सामन्यात हार्दिक विरोधात हूटिंग

यंदाचा आयपीएल सीजन सर्वात जास्त खराब कुठल्या खेळाडूसाठी ठरला, तो हार्दिक पांड्या आहे. गुजरात टायटन्सच नेतृत्व करताना हार्दिकने डेब्यु सीजनमध्ये टीमला चॅम्पियन बनवलं. मागच्या सीजनमध्ये टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. पण मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला तशी कामगिरी करता आली नाही. उलट प्रत्येक सामन्यात हार्दिक विरोधात हूटिंग करण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या टीमच प्रदर्शन घसरलं.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....