DC vs KKR: केकेआरच्या व्यंकटेशची अष्टपैलू खेळी, आयपीएलमधील खास रेकॉर्डचा मानकरी

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयात युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर पुन्हा चमकला आहे.

DC vs KKR: केकेआरच्या व्यंकटेशची अष्टपैलू खेळी, आयपीएलमधील खास रेकॉर्डचा मानकरी
व्यंकटेश अय्यर
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:55 PM

मुंबई: आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे केकेआरच्या पुढील फेरीच जाण्याच्या आशा जीवंत राहिल्या असून दिल्लीची सलग विजयांची मालिका खंडीत झाली आहे. या सामन्यात दिल्लीने दिलेल्या अवघ्या 128 धावांचा पाठलाग करतानाही केकेआरची दमछाक झाली. पण सामन्यात केकेआरचा एक खेळाडू मात्र पुन्हा चमकला. यंदाच्या हंगामातील केकेआर संघाचा खास खेळाडू व्यंकटेश अय्यर (Venktesh iyer) असं या खेळाडूचं नाव असून त्याने आजच्या सामन्यात 14 धावाच केल्या असल्या तरी 4 ओवरमध्ये केवळ 29 रन देत 2 विकेट्स घेतल्या. या त्याच्या आय़पीएलमधील पहिल्याच विकेट असल्याने तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला असून त्याने एक खास कामगिरीही केली आहे.

दिल्ली आणि केकेआर यांच्यातील सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला. अवघ्या 128 धावांचा पाठलाग करतानाही केकेआर संघाची अवस्था दिल्लीच्या गोलंदाजानी खराब केली. त्यामुळे सामना 19 व्या षटकापर्यंत तर गेलाच सोबतच केकेआर केवळ 3 विकेट्सच्या फरकाने जिंकली. सामन्यात शुभमन (30) आणि सुनीलच्या (21) खेळीसह नितीशची नाबाद 36 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान गोलंदाजीवेळी  अय्यरने हीटमायर आणि अक्षर पटेल या महत्त्वाच्या दिल्लीच्या खेळाडूंची विकेट संघासाठी महत्त्वाची ठरली.

व्यंकटेशकडून आय़पीएलची दमदार सुरुवात

दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी अय्यरने 3 मॅच खेळत 56 च्या सरासरीने 112 रन केले आहेत. यावेळी 156 इतका त्याचा स्ट्राइक रेट होता. यात एक अर्धशतकंही असून त्याने 14 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत. तसंच आज दिल्लीविरुद्ध 14 धावा केल्याच पण दोन विकेटही अय्यरने मिळवल्या.

टी-20 गोलंदाज म्हणून उत्तम कामगिरी

अय्यरच्या टी20 कारकिर्दीचा विचार करता 41 सामन्यात त्याने 26 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याची इकोनॉमी केवळ 6.95 एवढीच आहे. टी20 क्रिकेट प्रकारात ही इकोनॉमी अत्यंत चांगली असल्याने त्याच्या या कामगिरीते सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने 10 रन देत 2 विकेट घेतल्या होत्या. हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

हे ही वाचा

DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO

IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

(KKR teams Venkatesh Iyer Made good debute in IPL playing all rounder game for team with less than 7 economy as bowler)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.