IPL 2023 : Ajinkya Rahane मुळे टीम इंडियाच्या T 20 संघातील ‘या’ दिग्गज खेळाडूच स्थान येऊ शकतं धोक्यात

IPL 2023 : टेस्ट स्पेशलिस्ट अजिंक्य रहाणे असाच खेळत राहिला, तर टीम इंडियातील दिग्गज बॅट्समनच नक्कीच टेन्शन वाढणार. अजिंक्य रहाणे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये स्वप्नवत खेळ दाखवतोय. अनेक दिग्गजांनाही याच आश्चर्य वाटतय.

IPL 2023 : Ajinkya Rahane मुळे टीम इंडियाच्या T 20 संघातील 'या' दिग्गज खेळाडूच स्थान येऊ शकतं धोक्यात
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 8:42 AM

KKR vs CSK 2023 : यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये अजिंक्य रहाणेने सर्वांनाच थक्क करुन सोडलय. अजिंक्य रहाणेची बॅटिंग पाहून अनेकांना विश्वास बसत नाहीय. अजिंक्यमध्ये इतका बदल कसा झाला? टेस्ट स्पेशलिस्ट टी 20 स्पेशलिस्ट कसा बनला? असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आयपीएलचे मागचे तीन सीजन अजिंक्य रहाणेसाठी खास ठरले नव्हते. त्यांना विशेष चमकदार कामगिरी केली नव्हती. पण एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यानंतर तोच अजिंक्य पार बदलून गेलाय.

अजिंक्य रहाणेच्या मागच्या तीन सीजनमधील परफॉर्मन्सवर नजर टाकूया. 2020 मध्ये त्याने 9 मॅचेसमध्ये 113, 2021 मध्ये 2 मॅचेसमध्ये 8 आणि 2022 मध्ये 7 मॅचमध्ये 133 धावा केल्या. टीम इंडियाकडून तो फक्त कसोटी क्रिकेट खेळायचा. मागच्यावर्षी त्याला टीम इंडियाच्या टेस्ट टीममधून सुद्धा ड्रॉप केलं.

स्थानिक क्रिकेटमध्ये अजिंक्यची कामगिरी कशी होती?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य नव्हतं. टीम इंडियाच नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेची आयपीएल 2023 च्या लिलावात बेस प्राइस 50 लाख रुपये होती. चेन्नई सुपर किंग्सने त्याला याच प्राइसला विकत घेतलं. आता अजिंक्य रहाणे जो खेळ दाखवतोय, त्याची अपेक्षा कोणीही त्याच्याकडून केली नव्हती.

अजिंक्यकडून काय अपेक्षा नव्हती?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त निवडक फलंदाज 360 डिग्री शॉट्स खेळतात. एबी डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर जोस बटलर, सूर्यकुमार यादव, ग्लेन मॅक्सवेल 360 डिग्री फटके मारताना दिसलेत. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने असे अनेक शॉट्स मारले, ज्याची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती.

डोक्यावरुन सिक्स मारला

अजिंक्यने उमेश यादवचा एक चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर जाऊन विकेटकीपरच्या डोक्यावरुन सिक्स मारला. कुलवंत खेजरोलिया 18 वी ओव्हर टाकत होता. त्याने टाकलेल्या ओव्हरमधील लास्ट चेंडूवर रहाणेने आपल्या बॅटची ग्रीप बदलली आणि रिव्हर्स स्कूपचा शॉट खेळताना थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. या मॅचमध्ये अजिंक्यने 29 चेंडूत 71 धावा फटकावल्या. त्याने या इनिंगमध्ये 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याने 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. अजिंक्यमुळे टीम इंडियातील कुठल्या खेळाडूच्या स्थानाला धोका?

अजिंक्यने आतापर्यंत 2 हाफ सेंच्युरी झळकवताना 209 धावा केल्या आहेत. मोइन अली आजारी असल्यामुळे अजिंक्य रहाणेला मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर अजिंक्य रहाणेने मागे वळून पाहिलेलं नाही. अजिंक्यचा हाच फॉर्म कायम राहिला, त्याला दिनेश कार्तिकप्रमाणे टीम इंडियाच्या T20 संघात स्थान मिळालं, तर ,सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.