KKR vs CSK 2023 : Ajinkya Rahane च्या बॅटमधून निघालेल्या ‘त्या’ एका शॉटने दिग्गज झाले थक्क, VIDEO Viral

KKR vs CSK 2023 : मन जिंकून घेणाऱ्या 'त्या' शॉटवर केविन पीटरसनही स्वत:ला रोखू शकला नाही. अजिंक्य रहाणे सुद्धा असा शॉट मारु शकतो, यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. पण काल रात्री इडन गार्डन्सवर असं घडलं.

KKR vs CSK 2023 : Ajinkya Rahane च्या बॅटमधून निघालेल्या  'त्या' एका शॉटने दिग्गज झाले थक्क, VIDEO Viral
ajinkya rahaneImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 8:02 AM

KKR vs CSK 2023 : आयपीएल 2023 च्या सीजनच वैशिष्ट्य म्हणजे अजिंक्य रहाणे. या सीजनमध्ये अजिंक्य खोऱ्याने धावा काढतोय. त्यामुळे अनेक क्रिकेट पंडितांना आश्चर्याचा धक्का बसलाय. अजिंक्यच क्रिकेट संपलय, असं ज्यांना वाटत होतं, त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे. टीम इंडियाच्या बाहेर असलेला अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. CSK कडून पहिलाच सीजन खेळणाऱ्या अजिंक्यने आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घातलाय.

अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमधील फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण सध्याची त्याची टी 20 मधील बॅटिंग पाहून विश्वास बसत नाहीय. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध अजिंक्य रहाणे एक असाच फटका खेळला, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

किती लाखात अजिंक्यला विकत घेतलं?

खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियातील आपलं स्थान गमवाव लागलं. त्याच्यासाठी आयपीएलमधील मागचे काही सीजन चांगले गेलेले नाहीत. आयपीएलच्या यंदाच्या सीजनसाठी त्याला खरेदीदारही मिळत नव्हता. अखेर चेन्नईने त्याला 50 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या मॅचपासून त्याने आपल्या बॅटने धाक निर्माण केलाय.

रहाणेच्या शॉटचा पीटरसन फॅन

रहाणेने रविवारी इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध टी 20 मध्ये बॅटिंगचा मास्टर क्लास दाखवला. रहाणेने आपल्या स्टाइलमध्ये क्लासिकल ड्राइव्ह मारले. फुटवर्कचा वापर करुन मोठे फटके खेळले. फक्त 24 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या इनिंगमध्ये अजिंक्यने एक वेगळा फटका खेळला, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

लास्ट चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर होता

कुलवंत खेजरोलिया 18 वी ओव्हर टाकत होता. त्याने टाकलेला ओव्हरमधील लास्ट चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. रहाणेने आपल्या बॅटची ग्रीप बदलली आणि रिव्हर्स स्कूपचा शॉट खेळताना थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. रहाणेच्या या शॉटने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. टी 20 क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज केविन पीटरसनही स्वत:ला रोखू शकला नाही. रहाणेने जितके शानदार फटके मारले, त्यात हा सुद्धा एक आहे, असं पीटरसनने त्याच्या टि्वटमध्ये लिहिलय. चालू सीजनमध्ये रहाणेच्या किती धावा?

भारतीय टीमच कर्णधारपद भूषवलेल्या अजिंक्य रहाणेसाठी हा सीजन खूपच खास आहे. तो आतापर्यंत 5 इनिंग खेळलाय़. त्याची सरासरी 52 आणि स्ट्राइक रेट 199 चा आहे. त्याने आतापर्यंत 2 हाफ सेंच्युरी झळकवताना 209 धावा केल्या आहेत. यात कोलकाता विरुद्ध 29 चेंडूत 71 धावा आहेत. रहाणेने 6 चौकार आणि 5 षटकार लगावले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.