KKR vs GT Live Score, IPL 2022: रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा आठ धावांनी विजय

| Updated on: Apr 24, 2022 | 7:49 PM

kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live Score in Marathi: सलग तीन पराभवांमुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा केकेआरचा संघ सातव्या स्थानावर आहे.

KKR vs GT Live Score, IPL 2022: रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा आठ धावांनी विजय
KKR vs GT Live Score

केकेआर विरुद्धच्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने आठ धावांनी विजय मिळवला. अलझारी जोसेफने लास्ट ओव्हर टाकली. गुजरातच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने निर्धारित 20 षटकात आठ बाद 148 धावा केल्या.

अशी आहे गुजरात टायटन्सची Playing – 11 हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धीमान सहा, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अलझारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

अशी आहे केकेआरची Playing – 11 श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती,

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 23 Apr 2022 07:31 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला, आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण

    हैदराबादने टॉस जिंकला, आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण

  • 23 Apr 2022 07:31 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला, आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण

    हैदराबादने टॉस जिंकला असून आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिलंय.

  • 23 Apr 2022 07:30 PM (IST)

    रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा आठ धावांनी विजय

    केकेआर विरुद्धच्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने आठ धावांनी विजय मिळवला. अलझारी जोसेफने लास्ट ओव्हर टाकली. गुजरातच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने निर्धारित 20 षटकात आठ बाद 148 धावा केल्या.

  • 23 Apr 2022 07:25 PM (IST)

    सामना रंगतदार स्थितीत

    सामना रंगतदार स्थितीत आहे. आंद्रे रसेलची विकेट मिळाली आहे. चार चेंडूत 12 धावांची आवश्यकता आहे.

  • 23 Apr 2022 07:23 PM (IST)

    सहा चेंडूत 11 धावांची आवश्यकता

    केकेआरला सहा चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे. सात बाद 139 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 07:20 PM (IST)

    आंद्रे रसेलचा सिक्स

    आंद्रे रसेलने यश दयालच्या तिसऱ्या चेंडूवर सिक्स मारला. तो 19 वी ओव्हर टाकतोय. मोक्याच्या क्षणी मारला सिक्स

  • 23 Apr 2022 07:15 PM (IST)

    डेंजरस आंद्रे रसेल अजूनही खेळपट्टीवर

    17.2 षटकात केकेआरच्या सात बाद 121 धावा झाल्या आहेत. रसेल खेळपट्टीवर असून तो 32 धावांवर खेळतोय.

  • 23 Apr 2022 06:53 PM (IST)

    अभिनव मनोहरने घेतली जबरदस्त कॅच, वेंकटेश अय्यर OUT

    राशिद खानच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर अभिनव मनोहरने वेंकटेश अय्यरची जबरदस्त कॅच घेतली. त्याने 17 धावा केल्या. 98/6 अशी केकेआरची स्थिती आहे.

  • 23 Apr 2022 06:48 PM (IST)

    जीवदान मिळाल्यानंतर आंद्रे रसेलचे दोन सिक्स

    यश दयालच्या नो बॉल मुळे जीवदान मिळालेल्या आंद्र रसेलने पाचव्या चेंडूवर आणि सहव्या चेंडूवर थेट षटकार मारला. 13 षटकात केकेआरच्या पाच बाद 98 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 06:41 PM (IST)

    KKR चा निम्मा संघ तंबूत, रिंकू सिंह बाद

    केकेआरचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. 79 धावांवर यश दयालच्या गोलंदाजीवर सहाने झेल घेतला. रिंकू सिंहने 35 धावा केल्या.

  • 23 Apr 2022 06:27 PM (IST)

    केकेआरचा डाव अडचणीत

    केकेआरचा डाव अडचणीत आहे. नऊ षटकात त्यांच्या चार बाद 57 धावा झाल्या आहेत. रिंकू सिंह 26 आणि वेंकटेश अय्यर 3 ही जोडी मैदानात आहे.

  • 23 Apr 2022 06:16 PM (IST)

    यशच्या चेंडूवर रिंकूचा चौकार

    6व्या ओवरच्या तिसऱ्या चेंडूत यशच्या चेंडूवर रिंकूने चौकार मारला आहे. 7 ओवरमध्ये केकेआरच्या बाद 41 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 06:12 PM (IST)

    केकेआरला मोठा धक्का, श्रेयस अय्यर झेलबाद

    केकेआरला मोठा धक्का बसला असून श्रेयस अय्यर सहाव्या ओवरच्या पहिल्या बॉलमध्ये झेलबाद झालाय.

  • 23 Apr 2022 06:10 PM (IST)

    जोसेफच्या चेंडूवर रिंकू सिंगचा षटकार

    फर्ग्यूसनच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने षटकार मारला आहे, केकेआरच्या 6 ओवरमध्ये 3 बाद 34 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 06:05 PM (IST)

    फर्ग्यूसनच्या चेंडूवर श्रेयसचा षटकार

    फर्ग्यूसनच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने षटकार मारला आहे, केकेआरच्या 5 ओवरमध्ये 3 बाद 24 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 06:02 PM (IST)

    फर्ग्यूसनच्या चेंडूवर नितीश राणा आऊट

    फर्ग्यूसनच्या चेंडूवर चौथ्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये नितीश आऊट झालाय.

  • 23 Apr 2022 05:57 PM (IST)

    श्रेयस अय्यरचा चौकार

    तिसऱ्या ओवरच्या पाचव्या बॉलमध्ये जोसेफच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने चौकार मारलाय.

  • 23 Apr 2022 05:48 PM (IST)

    मोहम्मद शमीचा डबल स्ट्राइक, सुनील नरेन OUT

    मोहम्मद शमीने केकेआरला दुसरा धक्का दिला आहे. शमीने सुनील नरेनला पाच धावांवर फर्ग्युसनकरवी झेलबाद केलं. 2.3 षटकात 10/2 अशी केकेआरची स्थिती आहे.

  • 23 Apr 2022 05:45 PM (IST)

    केकेआरचा डाव सुरु झाल्यानंतर पहिली विकेट

    दोन षटकात केकेआरच्या एक बाद 10 धावा झाल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने सलामीवीर सॅम बिलिंग्सला सहाकरवी झेलबाद केलं. त्याने चार धावा केल्या.

  • 23 Apr 2022 05:22 PM (IST)

    आंद्रे रसेलने एक ओव्हरमध्ये घेतल्या चार विकेट

    हार्दिक पंड्याच्या 49 चेंडूतील 67 धावांच्या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने केकेआरला विजयासाठी 157 धावांचं लक्ष्य दिलं आहे. शेवटच षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलने एक ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या.

  • 23 Apr 2022 05:06 PM (IST)

    हार्दिक पंड्या पाठोपाठ राशिद खान OUT

    हार्दिक पंड्या पाठोपाठ राशिद खान तंबूत परतला आहे. टीम साउदीने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. 18 षटकात पाच बाद 140 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 04:55 PM (IST)

    डेविड मिलर आऊट

    फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डेविड मिलर आऊट झाला आहे. 27 धावांवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर त्याने उमेश यादवकडे सोपा झेल दिला. त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक 67 धावांवर खेळतोय. 16.2 षटकात गुजरात टायटन्सच्या 133/3 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 04:30 PM (IST)

    हार्दिक पंड्याची हाफ सेंच्युरी

    हार्दिक पंड्याची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. गुजरातच्या 12 षटकात दोन बाद 96 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 04:24 PM (IST)

    गुजरात टायटन्सला दुसरा झटका

    गुजरात टायटन्सला दुसरा झटका. वृद्धीमान सहा 25 धावांवर आऊट झाला. गुजरात टायटन्सच्या 10.2 षटकात 83/2 धावा झाल्या आहेत.

  • 23 Apr 2022 04:12 PM (IST)

    हार्दिक पंड्याची जबरदस्त फलंदाजी

    आठ षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 69 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 41 आणि वृद्धीमान सहा 17 धावांवर खळतोय.

  • 23 Apr 2022 04:01 PM (IST)

    पावरप्लेमध्ये गुजरातच्या एक बाद 48 धावा

    पावरप्लेच्या सहा षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 48 धावा झाल्या आहेत. वृद्धीमान सहा 16 आणि हार्दिक पंड्या 22 धावांवर खेळतोय.

  • 23 Apr 2022 03:55 PM (IST)

    हार्दिक-सहाची जोडी जमली

    पाच षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 43 धावा झाल्या आहेत. हार्दिक-सहाची जोडी जमली आहे.

  • 23 Apr 2022 03:47 PM (IST)

    सहा-पंड्याची जोडी मैदानात

    तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. गुजरात टायटन्सच्या एक बाद 31 धावा झाल्या आहेत. वृद्धीमान सहा 11 आणि हार्दिक पंड्या 11 धावांवर खेळतोय. सहाने या ओव्हरमध्ये एक षटकार लगावला.

  • 23 Apr 2022 03:42 PM (IST)

    आल्या आल्या हार्दिक पंड्याचे दोन चौकार

    दोन ओव्हर्समध्ये गुजरातच्या एक बाद 19 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्याने दोन चौकार लगावले. वृद्धीमान सहा आणि पंड्याची जोडी मैदानात आहे.

  • 23 Apr 2022 03:37 PM (IST)

    टिम साउदीने दिला झटका

    दुसरी ओव्हर टाकणाऱ्या टिम साउदीने गुजरात टायटन्सला झटका दिला आहे. भरवशाचा फलंदाज शुभमन गिल माघारी परतला आहे. त्याने सात धावा केल्या. बिलिंग्सकडे त्याने झेल दिला.

  • 23 Apr 2022 03:35 PM (IST)

    गुजरातच्या डावाला सुरुवात

    पहिल्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सच्या बिनबाद 8 धावा झाल्या आहेत. सहा आणि गिल ही सलामीची जोडी मैदानात आहे. उमेश यादवने पहिलं षटक टाकलं. या ओव्हरमध्ये एक चौकार लगावला.

  • 23 Apr 2022 03:15 PM (IST)

    अशी आहे केकेआरची Playing – 11

    श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती,

  • 23 Apr 2022 03:14 PM (IST)

    अशी आहे गुजरात टायटन्सची Playing – 11

    हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, अभिनव मनोहर, वृद्धीमान सहा, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अलझारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

Published On - Apr 23,2022 3:11 PM

Follow us
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.