KKR vs MI Playing XI IPL 2022: मुंबईच्या संघात दोन मोठे बदल, 18 वर्षाच्या खेळाडूचा डेब्यू

KKR vs MI Playing XI IPL 2022: IPL 2022 मध्ये आज 14 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) मध्ये होतोय. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर मॅच होत आहे.

KKR vs MI Playing XI IPL 2022: मुंबईच्या संघात दोन मोठे बदल, 18 वर्षाच्या खेळाडूचा डेब्यू
Mumbai Indians Image Credit source: Mumbai Indians
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:50 PM

IPL 2022 मध्ये आज 14 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) मध्ये होतोय. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर मॅच होत आहे. मुंबईसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात कोलकाता नाइड रायडर्सच्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आहे. त्याने पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केला आहे. कोलकात्याच्या संघात ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार पॅट कमिन्सचा (Pat Cummins) समावेश झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सूर्यकुमार यादवाचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव खेळला नव्हता. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील एक मोठा संघ आहे. त्यांनी पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावलं आहे.

केकेआरने मोठ्या खेळाडूला बाहेर बसवलं

तीनपैकी दोन सामने जिंकून केकेआर पॉइंटस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने या मोठ्या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. मागच्या दोन सामन्यात चांगली कामगिरी करुनही टिम साउदीला बाहेर बसवणयात आलं आहे. त्याच्याजागी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा संघात समावेश केला आहे. शिवम मावीच्या जागी रासिख सलामचा संघात समावेश केलाय. योगायोग म्हणजे रासिख मुंबईकडून डेब्यू केला होता.

मुंबईच्या संघात दोन बदल

मुंबई इंडियन्सच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादवचा संघात समावेश झाला आहे. अनमोलप्रीत सिंहच्या जागी त्याचा समावेश झाला आहे. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसचा आज मुंबईच्या संघात समावेश झाला आहे. 18 वर्षाच्या बेबी एबीने आयपीएलमध्ये आज डेब्यू केला. टिम डेविडच्या जागी ब्रेविसचा समावेश करण्यात आला आहे. बासिल थम्पीला वगळून जयदेव उनाडकटला संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. पण तसं घडलेलं नाही.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.