KKR vs PBKS playing XI IPL 2022: आज कोलकाता विरुद्ध पंजाब, अशी असू शकते playing XI
KKR vs PBKS playing XI IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध (KKR vs KXIP) होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल.
मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध (KKR vs KXIP) होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. आपलं विजयी अभियान कायम ठेवण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना होणार आहे. पंजाबने पहिल्या सामन्यात दोनशे पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. केकेआरच्या मागच्या सामन्यात आरसीबीकडून पराभव झाल आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबचा आत्मविश्वास केकेआरपेक्षा थोडा जास्त असेल. कोलकाता आणि पंजाब दोन्ही संघ प्लेइंग इलेवनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.
विजयी कॉ़म्बिनेशनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी
कोलकाता नाइट रायडर्स मागच्या दोन सामन्यातील संघ कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी पंजाब किंग्सही आपल्या विजयी कॉ़म्बिनेशनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. KKR पराभवानंतरही बदल करण्याची शक्यता कमी आहे. यामागे कारण आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध फलंदाजीत संपूर्ण टीमच अपयशी ठरली होती.
कोलकाताने याच प्लेइंग इलेवन सोबत चेन्नई सुपर किंग्सला नमवलं होतं. कोलकाता आणि पंजाब दोन्ही टीम्सचे कॅप्टन आयपीएलमध्ये नवीन आहेत. त्यांनी आपल्या कॅप्टनशिपची छाप उमटवली आहे. कोलकाताकडे गोलंदाज असतील, तर पंजाबकडे फलंदाज आहेत. हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघाची अशी असू शकते प्लेइंग इलेवन
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11 – मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, राज बावा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, हरप्रीत बार, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा, राहुल चाहर,
कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्या प्लेइंग 11 – अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नीतीश राणा, सुनील नरेन, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती,