IPL 2023 : आज हरले, तर आयपीएलमधल्या एका मोठ्या टीमचा गेम ओव्हर
IPL 2023 : आजची मॅच दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'. आता हार कुठल्याही टीमला परवडणारी नाहीय. आयपीएल 2023 चा सीजन आता निर्णायक टप्प्प्यावर आला आहे. विजयासाठी प्रत्येक टीम जोरदार प्रयत्न करतेय.
कोलकाता : IPL 2023 मध्ये आता, फक्त मॅचेस सुरु नाहीयत, तर एक लढाई सुरु झालीय. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी प्रत्येक टीम प्राणपणाने लढतेय. सामना जिंकण्यासाठी जास्तीत जास्त धावा बनवण आवश्यक आहे. जी टीम धावा करणार, ती टीम जिंकणार. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्यापासून स्वत:ला वाचवणं हेच प्रत्येक टीमच लक्ष्य आहे. आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणारा सामना त्याच दृष्टीने महत्वाचा आहे.
इथे पराभव मान्य नाहीय. हरणाऱ्या टीमच प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल. आयपीएल 2023 च्या पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान आणि कोलकाताची स्थिती एकसारखीच आहे. फरक फक्त रनरेटचा आहे.
म्हणून पॉइंट्स टेबलमध्ये ते वरती
राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या 11 मॅचेसपैकी 5 जिंकल्या आहेत. 6 सामन्यात पराभव झालाय. कोलकाताचा ग्राफ सुद्धा तसाच आहे. फक्त राजस्थानचा रनरेट कोलकातापेक्षा थोडा चांगला आहे. म्हणून पॉइंट्स टेबलमध्ये ते वरती आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
या सीजनमधील दोन्ही टीम्समधील हा पहिला सामना आहे. सामना कोलकाताच्या होम ग्राऊंडवर आहे. म्हणून जास्त संधी कोलकाताला असेल. बॅक टू बॅक विजय यामुळे सुद्धा केकेआरच मनोबल उंचावलेलं आहे. मागचा विजय इडन गार्डन्सवर मिळवला होता. राजस्थानची स्थिती अशी नाहीय. या टीमला मागच्या पाच पैकी फक्त एक मॅचमध्ये विजय मिळालाय. सलग तीन सामन्यात राजस्थानचा पराभव झालाय.
कशी आहे दोन्ही टीम्सची स्थिती?
दोन्ही टीम्सबद्दल बोलायच झाल्यास, राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये ट्रेंट बोल्ट पुनरागमन करु शकतो. मागची मॅच तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. कोलकाताच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. राजस्थानला ही मॅच जिंकायची असेल, तर त्यांच्या मधल्याफळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. शिमरॉन हेटमायरची सर्वात जास्त चिंता आहे. त्याने मागच्या 6 सामन्यात मिळून फक्त 35 धावा केल्यात. कोलकाच्या टीमला योग्यवेळी सूर गवसलाय.
इडन गार्डन्सचा पीच कसा आहे?
सामना इडन गार्डन्सवर असून धावांचा पाऊस या मॅचमध्ये पहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये इडनवर सरासरी स्कोर 205 आहे. त्याशिवाय पीचवर गोलंदाजांसाठी सुद्धा भरपूर काही आहे. चालू सीजनमध्ये या विकेटवर स्पिनर्सनी आतापर्यंत 31 विकेट काढलेत. वेगवान बॉलर्सनी 29 विकेट घेतल्यात.
KKR vs RR: Dream 11 Prediction
इडन गार्डन्सच्या पीचवर धावा सुद्धा बनतात आणि विकेट सुद्धा जातात. या मॅचसाठी ड्रीम इलेव्हन कशी असेल, त्यावर एक नजर टाकूया.
कीपर- रहमानुल्लाह गुरबाज, जोस बटलर
फलंदाज- जेसन रॉय, यशस्वी जैस्वाल, नीतीश राणा, रिंकू सिंह, संजू सॅमसन
ऑलराऊंडर्स- आंद्रे रसेल, सुनील नरेन
गोलंदाज- वरूण चक्रवर्ती, संदीप शर्मा