KKR vs RR IPL 2022: नशीब, प्रसिद्ध कृष्णाने जवळून केलेला थ्रो ट्रेंट बोल्टला किती जोरात लागला ते पहा, VIDEO
KKR vs RR IPL 2022: कोलकाताच्या डावात ट्रेंट बोल्ट तिसरं षटक टाकत होता. राजस्थानसाठी स्थिती अनुकूल होती. कारण केकेआरच्या सलामीवीरांना ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्ण विरुद्ध खेळताना अडचणी येत होत्या.
मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) आयपीएलमधला 47 वा सामना झाला. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे दोन संघ आमने-सामने होते. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतली. राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) केकेआरने 20 षटकात पाच बाद 152 धावांवर रोखलं. राजस्थान रॉयल्सला धाव फलकावर आणखी काही धावांची गरज होती. पण ते जमलं नाही. आजचा सामना जिंकण्यासाठी जास्त क्षमतेने खेळ करण्याची आवश्यकता आहे, हे राजस्थानच्या खेळाडूंना ठाऊक होतं. त्यामुळे गोलंदाज आणि फिल्डर्सनी आपल्या बाजूने सर्व प्रयत्न केले.
प्रसिद्ध कृष्णाकडून एक चूक झाली
कोलकाताच्या डावात ट्रेंट बोल्ट तिसरं षटक टाकत होता. राजस्थानसाठी स्थिती अनुकूल होती. कारण केकेआरच्या सलामीवीरांना ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्ण विरुद्ध खेळताना अडचणी येत होत्या. त्याचवेळी प्रसिद्ध कृष्णाकडून एक चूक झाली. सुदैवाने त्यामुळे ट्रेंट बोल्टला गंभीर दुखापत झाली नाही.
ट्रेंट बोल्ट थेट जमिनीवर कोसळला पहा VIDEO
ट्रेंट बोल्टच्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर केकेआरच्या बाबा इंद्रजीतने मिडऑन दिशेने खेळून सिंगल धाव घेतली. तिथे फिल्डिंग करणारा कृष्णा धावत आला. चेंडू उचलून त्याने विकेटकिपरच्या दिशेने फेकला पण तो बॉल जाऊन ट्रेंट बोल्टच्या पायला लागला.
Prasidh Krishna with a direct hit on Boult pic.twitter.com/iwapbDrqAc
— Vaishnavi Sawant (@VaishnaviS45) May 2, 2022
थ्रो इतका जोरदार होता की
थ्रो इतका जोरदार होता की, ट्रेट बोल्ट बॉल लागल्यानंतर जमिनीवर कोसळला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. बोल्टने पुन्हा गोलंदाजी केली. आजच्या ‘करो या मरो’ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. नितीश राणा (48) आणि रिंकू सिंह (42) राजस्थानच्या विजयाचे हिरो ठरले. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात कोलकाताला विजय आवश्यक होता. नितीश आणि रिंकूने अर्धशतकीय भागीदारी केली. त्या बळावर विजय मिळवता आला. नितीशने षटकार ठोकून कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानने केकेआरला विजयासाठी 153 धावांच आव्हान दिलं होतं.