IPL 2021: प्लेऑफच्या दिशेने केकेआरचं आणखी एक पाऊल, हैद्राबादवर 6 गडी राखून विजय

सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी केकेआरकरता महत्त्वाचा होता. दरम्यान हा सामना जिंकत केकेआरने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.

IPL 2021: प्लेऑफच्या दिशेने केकेआरचं आणखी एक पाऊल, हैद्राबादवर 6 गडी राखून विजय
शुभमन गिलने दमदार अर्धशतक ठोकलं
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 11:15 PM

IPL 2021: आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला यश आलं आहे. सनराजर्स हैद्राबाद (SRH) संघाला 6 विकेट्सनी मात देत केकेआरने गुणतालिकेतील चौथं स्थान कायम ठेवलं आहे. केकेआरने या विजयासह आयपीएल 2021 मधील 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांच प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न अजून जिवंत आहे.

आजच्या  सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, शिवम मावी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.

गिल-राणा जोडीची भागिदारी आणि केकेआर विजयी

दरम्यान केकेआरचा संघ 116 धावांचे सोपं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. यावेळी केकेआरची फलंदाजीही तशी ढासळली पण केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकत एकहाती डाव सांभाळला. त्याच्या सोबत राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला. विजयानंतर केकेआरच्या तंबूत आनंद पसरला होता.

उम्रानचा नवा रेकॉर्ड

सामन्यात हैद्राबाद संघाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला खरा पण या सामन्यात एक भारी गोष्ट हैद्राबाद संघासह भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने घडली आहे. हैद्राबाद संघातून टी नटराजनच्या जागी संघातून खेळणाऱ्या युवा गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) एक दमादर रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. उम्रान याने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नाही. पण सलामीच्या सामन्यात पहिल्याच षटकात ही कमागिरी करत मलिकने त्याच्या एन्ट्रीचं बिगुलचं जणू वाजवलं आहे. त्याच षटकात मलिकने पहिला चेंडू 145 kmph, दुसरा चेंडू 142 kmph, तिसरा चेंडू 150 kmph, चौथा चेंडू 147 kmph, पाचवा चेंडू 143 kmph आणि सहावा तेंडू 142 kmph या वेगाने फेकत ओव्हरची समाप्ती केली.

हे ही वाचा

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

(KKR won Match against SRH with wickets 6 in hands Shubhmans half century played important role in game)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.