KL Rahul donated 31 Lakh: 11 वर्षाच्या वरद नलावडेचे प्राण वाचवण्यासाठी केएल राहुलकडून 31 लाखाची मदत

उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. त्याच्या शानदार फलंदाजीचे लाखो चाहते आहेत. मैदानावर आपल्या खेळाने राहुल सर्वांचंच मन जिंकून घेतो.

KL Rahul donated 31 Lakh: 11 वर्षाच्या वरद नलावडेचे प्राण वाचवण्यासाठी केएल राहुलकडून 31 लाखाची मदत
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:25 PM

मुंबई: उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. त्याच्या शानदार फलंदाजीचे लाखो चाहते आहेत. मैदानावर आपल्या खेळाने राहुल सर्वांचंच मन जिंकून घेतो. पण आता मैदानाबाहेरही राहुलने केलेल्या एका कृतीचं सर्वचजण कौतुक करत आहेत. केएल राहुलने दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका 11 वर्षाच्या लहान मुलाची मदत केली आहे. केएल राहुलने लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी 31 लाख रुपयांची मदत केली आहे. वरद नलवाडे (Varad nalawade) असं या 11 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. ज्याला तात्काळ बोन मॅरो प्रत्यारोपणाची (Bone marrow Transplant) आवश्यकता होती. मुलाच्या आई-वडीलांनी एका NGO च्या माध्यमातून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली. केएल राहुलला जेव्हा या बद्दल समजलं तेव्हा त्याने त्या लहान मुलाची मदत केली.

वरद एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या आजारपणावर उपचारासाठी वडिलांनी PF ची सर्व रक्कम खर्च केली. पाचव्या इयत्तेत शिकणारा वरद मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला अप्लास्टिक एनीमिया नावाचा एक दुर्धर आजार आहे. या आजारात साधा ताप बरा होण्यासाठीही अनेक महिने लागतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच या आजारावर एकमेव उपचार आहे. त्यासाठी राहुलने पैसे दिलेत.

मदतीनंतर केएल राहुल म्हणाला….

“वरदबद्दल मला समजलं, तेव्हा माझ्या टीमने गिव इंडियाशी संपर्क साधला. जेणेकरुन आम्हाला त्याची सर्वप्रकारे मदत करता येईल. वरदची सर्जरी यशस्वी ठरली याचा आनंद आहे. वरद लवकरच स्वत:च्या पायावर उभा राहिलं अशी अपेक्षा आहे. मी जे केलय, त्यातून गरजूंना मदत करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळेल” असे केएल राहुल म्हणाला. वरदच्या आईने राहुलचे आभार मानले आहेत. “केएल राहुलच्या मदतीशिवाय इतक्या कमीवेळात माझ्या मुलाचं बोनमॅरो ट्रान्सप्लांट शक्य नव्हतं. माझ्या मुलाला वाचवण्यासाठी कोणी भारतीय क्रिकेटर येईल, याची मी कल्पनाही केली नव्हती” असे त्याच्या आईने सांगितलं.

Kl rahul donates 31 lakh rupees to save 11 year old boy life varad nalawade surgery

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.