IND VS NZ : टीम इंडियातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त, कानपूर कसोटीमधून बाहेर, सूर्यकुमारला संधी!

कत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

IND VS NZ : टीम इंडियातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त, कानपूर कसोटीमधून बाहेर, सूर्यकुमारला संधी!
KL Rahul - Virat Kohli
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 4:48 PM

कानपूर : नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला एक वाईट बातमी मिळाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलला दुखापत झाली असून तो कानपूर कसोटीतून बाहेर पडला आहे. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतही कसोटी मालिकेत खेळणार नाहीत आणि विराट कोहलीलाही कानपूर कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघ अडचणीत आला आहे. (KL Rahul Ruled Out of India vs New Zealand Kanpur Test Due to Injury)

टीम इंडियाने मंगळवारी कानपूरच्या मैदानात बराच वेळ सराव केला. सर्वप्रथम मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल सलामीच्या नेट सत्रासाठी मैदानात उतरले. केएल राहुलने दुखापतीमुळे सराव केला नाही. केएल राहुलच्या दुखापतीनंतर आता मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल हे दोघेजण सलामीला मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल दुखापतीतून सावरला तर शुभमन गिलला मधल्या फळीत खेळावे लागले. पण केएल राहुल अनफिट झाल्यानंतर शुभमन गिलला सलामीला उतरावे लागणार आहे.

सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पण करणार!

केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकतो. सूर्यकुमार यादवने आज कानपूरमध्ये बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. टीम इंडियाच्या कसोटी संघात शेवटच्या क्षणी सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्डही चांगला आहे. सूर्यकुमारने 77 सामन्यात 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव

न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, ​​नील वॅगनर

इतर बातम्या

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!

IND vs NZ: कसोटी मालिकेपूर्वी कोच राहुल द्रविडची रणनीती तयार, ओपनरला मिडल ऑर्डर फलंदाज बनवलं

भारताने दोनदा हातातली ICC Trophy गमावली; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची खंत

(KL Rahul Ruled Out of India vs New Zealand Kanpur Test Due to Injury)

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.