IND vs WI: …आणि मैदानातच केएल राहुल सूर्यकुमारवर झाला नाराज, पाहा VIDEO

वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात (India vs West indies 2nd odi) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने शानदार फलंदाजी केली.

IND vs WI: ...आणि मैदानातच केएल राहुल सूर्यकुमारवर झाला नाराज, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 6:26 PM

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात (India vs West indies 2nd odi) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. अवघ्या एका रन्सने त्याचं अर्धशतक हुकलं. संघाचा डाव अडचणीत असताना, केएल राहुल (KL Rahul) फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. त्याने सूर्यकुमार यादवसोबत (Suryakumar yadav) मिळून चौथ्या विकेटसाठी 90 धावांची भागादारी केली. 48 चेंडूत 49 धावा करताना त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. संघाची धावसंख्या तीन बाद 43 असताना केएल राहुल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने कुठलाही दबाव न घेता धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. त्यामुळे सूर्यकुमार यादवला सुद्धा सहज फलंदाजी करता आली. ही जोडी भारताला तारेल असे वाटत असतानाच, राहुल धावबाद झाला. सूर्यकुमार आणि राहुल मध्ये धाव घेताना गोंधळ उडाला आणि राहुल धावबाद झाला. त्याच्यामते ही धाव घेताना सूर्यकुमारने चूक केली. त्यामुळे रनआऊट झाल्यानंतर त्याने सूर्यकुमारवर आपली नाराजी व्यक्त केली.

राहुल रनआऊट झाला. पण याच सामन्यातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 16 वर्षानंतर भारतीय फलंदाज 49 धावांवर रनआऊट झाला. केएल राहुलच्या आधी 2006 मध्ये भारताचे हेड कोच राहुल द्रविड 49 धावांवर खेळताना रनआऊट झाले होते. अजब योगायोग म्हणजे राहुल द्रविड सुद्धा अहमदाबादमध्येच वेस्ट इंडिज विरुद्ध रनआऊट झाले होते. राहुलचं रनआऊट होणं, भारताला महाग पडलं. कारण राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. राहुल बाद झाल्यानंतर तशी दुसरी मोठी भागीदारी होऊ शकली नाही.

सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावलं. तो 64 धावांवर बाद झाला. अहमदाबादच्या या पीचवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळाली. त्यामुळे भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर माघारी परतले.

पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजची जी हालत केली होती, दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजनेही तशीच सुरुवात केली. ओडियन स्मिथने यात महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाने आज ऋषभ पंतला सलामीला आणून सर्वांनाच धक्का दिला. पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण ओडियन स्मिथने पंतला माघारी धाडलं.

kl rahul run out on 49 reminds rahul dravid suryakumar yadav watch video india vs west indies 2nd odi

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.