राहुल द्रविडच्या नेतृत्त्वात कसे तयार होतात चॅम्पियन? केएल राहुलने केला खुलासा, म्हणाला…
टी20 विश्वचषकानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 3 टी20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी टी20 संघाचा उपकर्णधार म्हणून केएल राहुल जबाबदारी पार पाडणार आहे.
मुंबई: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 world cup) भारतीय संघाने खूप खराब प्रदर्शन केलं. पण आता हे सारं विसरुन एक नवी सुरुवात संघाला करावी लागणार आहे. यासाठी न्यूझीलंडविरुद्धचे आगामी सामने एक चांगली संधी आहे. 17 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापूर्वी माध्यमांशी बोलताना टी20 संघाचा नवनिर्वाचीत उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने संघाचा नवनिर्वाचीत हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याबद्दल स्तुतीसुमनं उधळली.
राहुल द्रविडच्या संघाशी जोडल्या गेल्याने संघाला कसा फायदा होईल आणि द्रविड खेळाडूंना कशाप्रकारे वागणूक देतो या साऱ्याबद्दल केएलने सांगितलं आहे. केएल माध्यमांशी बोलताना त्याला विचारण्यात द्रविडबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, ‘मी खूप भाग्यवान आहे की मी राहुल द्रविड यांना आधीपासून ओळखतो. मी लहान असताना त्यांचा खेळ समजण्याचा प्रयत्न करायचो. कर्नाटकमध्ये त्यांनी आमची खूप मदत केली. देशातील अनेक भागातील युवा खेळाडूंना त्यांनी खूप मार्गदर्शन केले आहे. ते टीम इंडियसोबत जोडल्यावर संघाला खूप फायदा होणार आहे.’
राहुल द्रविड कसे बनवतो चॅम्पियन खेळाडू?
द्रविडने अनेक युवा चॅम्पियन खेळाडू भारतीय क्रिकेटला दिल्याचं आपण जाणतो. याबद्दलच बोलताना केएल म्हणाला, ‘द्रविड हे एका चांगल्या खेळाडूला चॅम्पियनमध्ये बदलतात. मी त्यांच्या कोचिंग अंडर इंडिया ए मध्ये काही सामनेही खेळलो आहे. त्यांची खास गोष्ट म्हणजे ते खेळाला एकदम खोलवर समजतात. तसंच ड्रेसिंग रुममधलं वातावरण कायम हलकं फुलकं ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्यामुळे खेळाडूंना मदत मिळते.’
? ? It’s a great opportunity to learn from him. #TeamIndia vice-captain @klrahul11 on working with the newly-appointed Head Coach Rahul Dravid. ?#INDvNZ pic.twitter.com/Aqzp0YCXRE
— BCCI (@BCCI) November 15, 2021
द्रविडवर मोठी जबाबदारी
भारतीय संघ सध्या जगातील अव्वल दर्जाचा क्रिकेट संघ असतानाही 2013 नंतर एकही आयसीसी चषक भारताला जिंकता आलेला नाही. संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह सारखे दिग्गज खेळाडू असतानाही संघ टी20 वर्ल्ड कप 2021 च्या सेमीफायनलपर्यंतही पोहचू शकला नाही. त्यामुळे आता नवा कोच राहुलच्या मार्गदर्शनाखाली मात्र भारताला आयसीसी चषकावर नाव कोरावचं लागेल. आता भारताचं लक्ष्य 2022 चा टी20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे तो असणार आहे. त्यानंतर 2023 चा वनडे वर्ल्ड कप भारतामध्ये असून तो भारताचं पुढील लक्ष्य असेल.
इतर बातम्या
T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली
भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
(KL Rahul says how rahul dravid produces champions)