खेळतो दक्षिण आफ्रिकेसाठी पण ह्दय मात्र ‘हिंदुस्तानकडे’, कालच्या सामन्यातील कॅप्टन Keshav Maharaj ची गोष्ट

केशव या नावावरुनच भारताशी असलेलं कनेक्शन लगेच लक्षात येतं. भले आपलं मूळ, वंश दुसऱ्यादेशाशी संबंधित असेल, पण आपला जन्म जिथे झालाय, त्या मातीशी प्रामाणिक असलं पाहिजे.

खेळतो दक्षिण आफ्रिकेसाठी पण ह्दय मात्र 'हिंदुस्तानकडे', कालच्या सामन्यातील कॅप्टन Keshav Maharaj ची गोष्ट
keshav maharaj Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 1:43 PM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील (IND vs SA) काल पाचवा टी 20 सामना रद्द झाला. पावसाने या सामन्यावर पाणी फिरवलं. त्यामुळे मालिकेचा निकाल लागू शकला नाही. मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. कालचा सामना रद्द झाला. पण या सामन्याच आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेने एका भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. त्या खेळाडूच नाव आहे, (Keshav Maharaj) केशव महाराज. केशव या नावावरुनच भारताशी असलेलं कनेक्शन लगेच लक्षात येतं. भले आपलं मूळ, वंश दुसऱ्यादेशाशी संबंधित असेल, पण आपला जन्म जिथे झालाय, त्या मातीशी प्रामाणिक असलं पाहिजे. केशव महाराजही बिलकुल तसाच आहे. केशव महाराजचा जन्म दक्षिण आफ्रिकेत (South Africa) झाला. तो पक्का व्यावसायिक खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी तो क्रिकेट खेळतो. पण मनाने मात्र तो पक्का भारतीय आहे. केशव महाराजच कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक आहे. मात्र त्याच्यावर लहानपणापासून घरात भारतीय आचार-विचारांचे संस्कार झाले आहेत.

हिंदू देवतांचे फोटो पोस्ट केले

त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने हिंदू देवतांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यातून त्यांच भारताशी असलेलं कनेक्शन लगेच लक्षात येतं. वंशाने भारतीय असलेला हा खेळाडू आज दक्षिण आफ्रिकन संघाचा प्रमुख आधार स्तंभ आहे.

उत्तर प्रदेशशी खास कनेक्शन

केशव महाराजचं उत्तर प्रदेशशी खास कनेक्शन आहे. केशव महाराजचे पूर्वज उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यातील होते. त्याच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. आई-वडिल, तो आणि बहीण. बहिणीच लग्न झालय. वडिलांनी एका मुलाखतीत भारताबरोबर असलेल्या कनेक्शनचा खुलासा केला होता.

पूर्वजांनी भारत कधी सोडला?

केशवच्या पूर्वजांनी 1874 मध्ये उत्तर प्रदेशतील सुल्तानपूर सोडलं व दक्षिण आफ्रिकेत डरबन मध्ये येऊन स्थायिक झाले. त्यावेळी अनेक भारतीय दक्षिण आफ्रिकेत येऊन स्थायिक झाले. आज ते इकडचे नागरिक आहेत.

केशव महाराज हनुमान भक्त

केशव महाराज हनुमान भक्त आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातो. त्याचं कुटुंब भारतीय सणवार उत्सव साजर करतं. केशव भले दक्षिण आफ्रिकेसाठी खेळत असेल, पण त्याच मन मात्र भारतीयचं आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.