DC vs SRH, Head to Head: कोरोनाच्या सावटाखाली हैद्राबादची लढत बलाढ्य दिल्लीसोबत, कोण असतील अंतिम 11 शिलेदार?

आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यातच हैद्राबादचा गोलंदाज टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

DC vs SRH, Head to Head: कोरोनाच्या सावटाखाली हैद्राबादची लढत बलाढ्य दिल्लीसोबत, कोण असतील अंतिम 11 शिलेदार?
DC vs SRH
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 5:05 PM

IPL 2021 : कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली आयपीएल (IPL 2021) आता संपूर्ण काळजी घेऊन युएईमध्ये सुरु करण्यात आली आहे. पण स्पर्धेच्या चौथ्याच दिवशी पुन्हा एकदा कोरोना महामारीने शिरकाव केल्यामुळे सर्व संघ व्यवस्थापनासह बीसीसीआय़ची (BCCI) डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान कोरोनाबाधित आढळलेला खेळाडू टी नटराजन (T natrajan) असलेल्या हैद्राबाद संघाचाच (SRH) आज सामना असून त्यांची भिडत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाशी आहे. दरम्यान नटराजनसह त्याच्या संपर्काती व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये विजय शंकर हा एकच खेळाडू असल्याने उर्वरीत खेळाडूंच्या मदतीने आजचा सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या हाल्फमध्ये दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर सर्वात खराब परिस्थिती ही हैद्राबाद संघाची होती. त्यांनी 7 पैकी केवळ एकच सामना जिंकला असल्याने आजचा सामना जिंकून आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हैद्राबाद करेल.

आतापर्यंत DC vs SRH

यंदा पार पडलेल्या आयपीएलमध्ये दिल्लीचं पारडं हैद्राबादच्या तुलनेत अधिक जड आहे. दिल्ली दुसऱ्या स्थानावर असून हैद्राबाद शेवटच्या स्थानावर आहे. पण आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता हैद्राबाद दिल्लीवर जड आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा आमने-सामने आले आहेत. ज्यात अधिक विजय हैद्राबादने मिळवले असून त्यांनी 11 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली केवळ 8 सामने जिंकण्यातच यशस्वी झाली आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टयनिस, शिमरॉन हिटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान

सनरायजर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), विराट सिंग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

हे ही वाचा

IPL 2021: पंजाब किंग्सचा दीपक हुडा एका फोटोमुळे अडचणीत, BCCI करणार चौकशी, काय आहे ही पोस्ट?

मोठी बातमी: IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव, सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू कोरोनाबाधित, 6 जण विलगीकरणात

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

(Know Head to head of todays match DC vs SRH match and Know probable playing 11 for Todays IPL Match)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.