KKR vs SRH, Head to Head: केकेआरला प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा, हैद्राबादसाठी सामना केवळ औपचारिकता, कोणाचं पार जड?

आज सायंकाळीचा सामना सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये होत असून केकेआरसाठी आजचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. हैद्राबादचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

KKR vs SRH, Head to Head: केकेआरला प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा, हैद्राबादसाठी सामना केवळ औपचारिकता, कोणाचं पार जड?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 3:36 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनराजर्स हैद्राबाद (SRH) या संघामध्ये सायंकाळी सुरु होणार आहे. हा सामना प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी केकेआऱ संघासाठी फार महत्वाचा असणार आहे. तर हैद्राबाद संघाचं यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी ते विजय मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. दरम्यान सध्या सर्व क्रिकेटप्रेमी विराटच्या आरसीबी आणि राहुलच्या पंजाब किंग्स (RCB vs PBKS) यांच्यातील सामना पाहण्यात व्यस्त आहेत. पण सायंकाळच्या केकेआर विरुद्ध हैद्राबाद सामन्याआधी दोघांचा इतिहास जाणू घेऊया…

यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता केकेआरचा संघ आतापर्यंत 12 सामने खेळला असून त्यातील 5 सामने विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 10 गुण असून ते नेटरनरेट्च्या जोरावर चौथ्या स्थानावर आहेत. तर हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे कारण 11 केवळ 2 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात 4 गुण असून ते सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत.

केकेआर प्लेऑफमध्ये जाणार का?

दरम्यान प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि केकेआरसह पंजाब या संघाची जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यात मुंबईने नुकताच दिल्लीविरुद्धचा सामना पराभूत झाल्याने केकेआर अजूनही चौथ्या स्थानावर कायम असून आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने जाण्यासाठी ते आणखी एक मोठं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत.

कोलकाता विरुद्ध हैद्राबाद Head To Head

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि हैद्राबाद हे संघ 20 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं जड असून त्यांनी 20 पैकी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैद्राबाद केवळ 7 वेळाच विजय मिळवू शकली आहे. दरम्यान आज होणारा सामना दुंबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैद्राबाद – जेसन रॉय , रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), अभिशेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

हे ही वाचा

RCB vs PBKS Live Score, IPL 2021 : नाणेफेक जिंकून बँगलोरचा फलंदाजी करण्याचा निर्णय

IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा

IPL 2021 : कॅप्टन कूलने सांगितली राजस्थानविरुद्धच्या पराभवामागची कारणं, ऋतुराजबद्दल धोनीचं मोठं वक्तव्य

(Know Head to head of todays match KKR vs SRH match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.