MI vs KKR, Head to Head: कोलकात्यासमोर मुंबईचे तगडे आव्हान, काय सांगतात आतापर्यंतचे आकडे?

दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजयाने करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आज तगड्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. दरम्यान दोन्ही संघामधील सामन्यांची आतापर्यंतची आकडेवारी काय म्हणतेय? हे पाहूया

MI vs KKR, Head to Head: कोलकात्यासमोर मुंबईचे तगडे आव्हान, काय सांगतात आतापर्यंतचे आकडे?
MI vs KKR
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:00 PM

IPL 2021: सध्या आयपीएल चॅम्पियन असणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आज कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) भिडणार आहे. आयपीएल स्पर्धेचे सर्वाधिक खिताब असणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात यंदा खास झालेली नसून त्यांना चेन्नईने पहिल्याच सामन्यात पराभूत केले. तर दुसरीकडे पहिला हाल्फ चांगलं न गेलेल्या केकेआरने मात्र सलामीच्या सामन्यातच आरसीबीला धुळ चारल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमकं कोण कोणावर भारी पडणार? आणि पहिल्या सामन्यात मुंबईच्या संघात नसणारा कर्णधार रोहित (Rohit Sharma) आणि अष्टपैलू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) आज खेळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

गुणतालिकेचा विचार करता मुंबईचा संघ आतापर्यंत 8 सामने खेळला असून त्यातील 4 मध्येच विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे मुंबई 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर केकेआरच्या संघाने 8 पैकी 3 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात 6 गुण असून ते सहाव्या स्थानावरच आहेत.

मुंबई विरुद्ध केकेआर Head To Head

आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि केकेआर 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबईचा पगडा कमालीचा भारी असून त्यांनी 28 पैकी 22 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केकेआर केवळ 6 वेळाच विजय मिळवू शकली आहे. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध तीनदा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये दोन वेळा मुंबईचाच संघ जिंकला आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या,  कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

IPL 2021: दिल्लीकडून पराभवानंतर सनरायजर्स हैद्राबाद संघाची ‘मिस्ट्री गर्ल’ पुन्हा चर्चेत, इंटरनेटवर व्हायरल झाले PHOTO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

IPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय

(Know Head to head of todays match MI vs KKR match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Mumbai Indians vs Kolkata Knight Riders)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.