RCB vs KKR, Head to Head: विराटसेना केकेआरशी लढतीसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?, तर कोण होणार स्पर्धेबाहेर?
यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन संघापैकी एक संघ सर्वांसमोर आला आहे. धोनीचा चेन्नई संघ अंतिम फेरीत पोहोचला असून आता दुसरा संघ कोणता? ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाचे अंतिम तीन सामने आता उरले आहेत. आधीच दिल्ली कॅपिटल्सला (DC) नमवत चेन्नई सुपरकिंग्सने (CSK) अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी दिल्ली, केकेआर, आरसीबी या संघामध्ये चुरस आहे. दिल्लीला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी एक संधी असून त्यांची लढत आज आरसीबी आणि केकेआर (RCB) यांच्यातील विजेत्याबरोबर असणार आहे.
आज होणारा विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) आणि इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघासाठी अगदी करो या मरोची लढाई आहे. विजेता संघ दिल्लीसोबत अंतिम सामन्यात जाण्यासाठी एक सामना खेळेल तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाईल. त्यामुळे आजची लढत अतिशय महत्त्वाची असून चुरशीची होणार हे नक्की!
आरसीबी विरुद्ध दिल्ली Head To Head
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि केकेआर हे संघ 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये केकेआरचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 15 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा संघ 13 वेळाच विजय मिळवू शकला आहे. आज होणारा सामना प्रसिद्ध ऐतिहासिक स्टेडियममध्ये होणार आहे.
आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11
रॉयल चँलेजर्स बंगळुरु-विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, डॅनियल ख्रिस्टीयन, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रस्सेल/शाकिब अल् हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा-
IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास
IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी
IPL 2021 : एलिमिनेटर सामन्याआधी 2 स्टार खेळाडूंनी सोडली RCB ची साथ, विराटसेना अडचणीत
(Know Head to head of todays match RCB vs KKR Eliminator match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Royal challengers banglore vs Kolkata knight riders)