PBKS vs RR, Head to Head: राजस्थान विरुद्ध पंजाब लढतीत कोण कोणावर भारी?, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे दोन्ही संघ मैदानात आमने-सामने असतील. पहिल्या पर्वात दोघांमधील सामना अत्यंत उत्कंठावर्धक झाला होता. पंजाबने 4 धावांनी विजय मिळवला होता.

PBKS vs RR, Head to Head: राजस्थान विरुद्ध पंजाब लढतीत कोण कोणावर भारी?, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
केएल राहुल
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:04 PM

मुंबई: आयपीएलच्या (IPL 2021)  स्पर्धेत आज (21 सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) हे संघ एकमेंकाशी भिडणार आहेत. दोघेही उर्वरीत पर्वाची सुरुवात आजच्या सामन्याने करणार आहेत. यंदाच्या पर्वात आतापर्यंत दोन्ही संघाची अवस्था जवळपास समान आहे. दोन्ही संघ आणि त्यांचे कर्णधार चांगली कामगिरी करत असले तरी ते आपल्या संघाला टॉप 4 मध्ये घेऊन जाऊ शकलेले नाहीत. पंजाब किंग्सने 8 पैकी 3 सामने जिंकत सातवं स्थान पटकावलं आहे. तर राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत सहावं स्थान पटकावलं आहे.

आज दोन्ही संघाच्या फलंदाजीचा विचार करता राजस्थान त्यांचे महत्त्वाचे खेळाडू बेन स्टोक्स, जोस बटलर यांच्या अनुपस्थितीने तणावात आहे. पण त्यांच्या जागी धुरंदर असे एविन लुईस आणि लियाम लिविंगस्टोन हे संघात आले आहेत. तर पंजाबकडे ताकदवर ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुल यांची ताकद आहे.

इंग्लंडचा फिरकीपटू पंजाब किंग्समध्ये

पंजाबच्या संघाने इंग्लंडच्या आदिल रशीद (Adil Rashid) याला विकत घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाए रिचर्डसन (Jhye Richardson) याच्याजागी रशीदला संधी दिली आहे. रिचर्डसनने उर्वरीत आयपीएलमधून माघार घेतल्याने पंजाबने हा निर्णय घेतला आहे. आदिलसह संघात ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू नाथन एलिस याला संधी देण्यात आली आहे. रिले मेरडिथच्या जागी नाथन खेळेल.

जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi). आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे. टायने उर्वरीत आयपीएलमधून कोरोनाच्या कारणामुळे माघार घेतली आहे. राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने त्याच्या जागी ग्लेन फिलीप्सला संधी देण्यात आली आहे.

Head To Head रेकॉर्ड

दोन्ही संघ आतापर्यंत 22 वेळा आयपीएलच्या इतिहासात आमने-सामने आले आहेत. यातील 12 वेळा राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तर 10 वेळा पंजाबच्या संघाने बाजी मारली आहे. मागील पाच सामन्यांचा विचार करता तीन वेळा पंजाबने विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा इतिहास एकमेंकाना तोडीस तोड आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, तबरेज शम्सी, चेतन सकारीया. 

पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, दीपक हुडा, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा :

IPL 2021: केकेआरचा डॅशिंग विजय, 9 विकेट्सनी सामना घातला खिशात

AUSW vs INDW, 1st ODI: भारतीय महिलांना नमवत ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, असा विक्रम करणारा पहिलाच महिला संघ

भारतीय क्रिकेटमध्ये होणार महत्त्वपूर्ण बदल, BCCI च्या बैठकीत मोठे निर्णय, सर्व बदल जाणून घ्या एका क्लिकवर

(Know Head to head of todays match RR vs PBKS Know probable playing 11 for Todays IPL Match)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.