IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?

इंडियन प्रिमीयर लीगच्या यंदाच्या पर्वातील (IPL2021) अंतिम सामन्यात खेळणारा पहिला संघ आज आपल्याला मिळणार. आहे गुणतालिकेतील अव्वल स्थानी असणाऱ्या चेन्नई आणि दिल्ली या दोघांमध्ये आजा क्वॉलीफायर 1 चा सामना खेळवण्यात येणार आहे.

IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:23 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगचा 14 वा हंगाम (IPL 2021) आता अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. आज होणाऱ्या सामन्यातून तर अंतिम सामन्यात खेळणारा पहिला संघही आपल्याला मिळणार आहे. आजचा सामना गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs DC) यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन संघासाठी यंदाची आयपीएल भारी गेली आहे. दोन्ही संघांचे सर्वच खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये असल्याने आज धमाकेदार सामना होईल हे नक्की!

दोन्ही संघाच्या गुणतालिकेतील स्थानाचा विचार करता दिल्लीच्या संघाने 14 पैकी 10 सामने जिंकत 20 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर चेन्नईच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकत 18 गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे.  प्लेऑफमध्ये गेलेल्या आरसीबी आणि केकेआर यांच्यापेक्षा दोघांचे गुण अधिक असल्याने या दोघांच्यातील विजयी संघाला थेट अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळणार आहे.

अजून एक संधी…

आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात जाणार असून पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी असेल. सोमवारी होणाऱ्या केकेआर विरुद्ध आरसीबी या दुसऱ्या प्लेऑफच्या सामन्यात (एलिमिनेटर) विजेता संघासोबत आजच्या पराभूत संघाला सामना खेळून पुन्हा एकदा अंतिम सामन्यात जाण्याची संधी मिळणार आहे.

आतापर्यंतच्या सामन्यात चेन्नई पारडे जड

चेन्नई आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 25 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी तब्बल 15 सामने जिंकत चेन्नईने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. तर दिल्ली 10 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. मात्र लीग फेरीतील दोघांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 3 विकेट्नसनी मात दिली आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, रिपल पटेल, अक्षर पटेल, ए. नॉर्खिया, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान

हे ही वाचा 

IPL 2021 च्या लीग सामन्यांनंतर ऑरेंज कॅप केएल राहुलकडे, अशी आहे संपूर्ण यादी

#MIvsSRH : सामना जिंकला, पण रनरेटच्या लढाईत मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही, KKR चाहत्यांकडून मजेशीर मीम्स व्हायरल

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

(Know preview of todays Qualifier 1 match DC vs CSK and Know probable playing 11 for Todays IPL Match)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.