DC vs KKR, IPL 2021 Qualifier 2, Preview: दिल्ली आणि कोलकात्यात चुरशीची लढत, कोण पोहोचणार अंतिम सामन्यात?

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यामध्ये आता केवळ एक सामना शिल्लक आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला असून आज दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांमध्ये ही लढत असेल.

DC vs KKR, IPL 2021 Qualifier 2, Preview: दिल्ली आणि कोलकात्यात चुरशीची लढत, कोण पोहोचणार अंतिम सामन्यात?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:31 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगचा 14 वा हंगाम (IPL 2021) आता अगदी अंतिम टप्प्यात आला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) रुपात आपल्याला अंतिम सामना खेळणारा एक संघ मिळाला आहे. त्यानंतर आजच्या सामन्यातून अंतिम सामन्यात खेळणारा दुसरा संघही आपल्याला मिळणार आहे. आज स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत.

गुणतालिकेत अगदी अव्वल स्थानी असणाऱ्या दिल्लीला क्वालिफायर एकच्या सामन्यात चेन्नईने पराभूत केल्याने त्यांना आज हा सामना खेळावा लागत आहे. तर रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये आलेल्या केकेआरने आरसीबीला नमवत इथवर मजल मारली आहे. त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी केकेआरनेही मागील काही सामन्यात दाखवलेल्या खेळीमुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की!

केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Head to Head

केकेआर आणि दिल्ली हे संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी 15 सामने जिंकत केकेआर पुढे आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. य़ाशिवाय एक सामना हा अनिर्णीत देखील राहिला आहे. पण आजचा सामना अतिशय महत्त्वाचा असल्याने दोन्ही संघ संपूर्ण प्रयत्न करणार असून अंतिम 11 काय असेल? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, ए. नॉर्खिया, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान

इतर बातम्या

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

(Know preview of todays Qualifier 2 match DC vs KKR and Know probable playing 11 for Todays IPL Match)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.