India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?

भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताच्या तिनही दिग्गज फलंदाजाची शिकार करणाऱ्या शाहीनची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. तर नेमका हा शाहीन कोण आहे? आणि माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीशी त्याचं नातं काय आहे? पाहूया...

India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?
शाहीन आणि शाहीद आफ्रिदी
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:19 PM

T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना पार पडला. अगदी एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला. यावेळी पाकिस्तानने उत्तम फलंदाजी केलीच. पण प्रथम गोलंदाजीच्या वेळी भारतावर केलेल्या हल्ल्यांमुळे भारत आधीच खचला होता, ज्यामुळे नंतर गोलंदाजीवेळीही भारतावर तणाव कायम राहिला. दरम्यान गोलंदाजीमध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली ती पाकचा 21 वर्षीय गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने. त्याने सर्वात आधी शून्य धावांवर खेळणाऱ्या रोहितला, पाठोपाठ 3 धावांवर खेळणाऱ्या केएल राहुलला आणि अखेर विराटला बाद करत महत्त्वाचे विकेट घेतले.

दरम्यान शाहीनच्या या यशानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा असून आफ्रिदी हे आडनाव क्रिकेट जगताला चांगलच ठाऊक आहे. ते म्हणजे पाकचा माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदीमुळे. शाहीदनेही अनेक सामन्यात अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी केल्याची उदाहरणं आहेत. दरम्यान या दोन्ही आफ्रिदीचं नातं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान या दोघांचं रक्ताचं नातं नसलं तरी शाहीन हा शाहीदच्या मुलीशी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची मात्र चर्चा आहे. नुकतचं मार्चमध्ये शाहीदने याबाबत माहिती दिली होती.

कोण आहे शाहीन आफ्रिदी?

सध्या पाकिस्तान संघाच्या टेस्ट, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात एक उत्तम गोलंदाज असणारा शाहीन हा 21 वर्षाचा आहे. सात भावांमध्ये सर्वात छोटा असणारा शाहीन अगदी 4 वर्षाचा असल्यापासून क्रिकेट खेळतो आहे. त्याचा मोठा भाऊ रियाज आफ्रिदी याने त्याला क्रिकेट शिकवलं. रियाजने पाककडून 2004 साली एकमेव कसोटी सामना खेळला होता. दरम्यान शाहीनने 2015 साली अंडर16 संघातून ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तेव्हापासून तो संघातून खेळत आहे. 2018 विश्वचषकातही तो अंडर19 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघात होता. यावेळी 5 सामन्यात त्याने 12 विकेट्स घेतल्या. आतापर्यंत 19 टेस्ट सामन्यात त्याने 76, 28 वनडेमध्ये 63 आणि 31 टी20 सामन्यात 35 विकेट्स घेतल्या आहेत.

असा पार पडला सामना

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(Know what is relation between shaheen and shahid afridi)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.