कोहलीचे दिवस फिरलेलेच ! क्रिकेटच्या देवानेही त्याला बेस्ट टीममधून वगळलं, धोनीचं काय झालं?
सर्वात धक्कादायक म्हणजे सध्याचा जगातला बेस्ट बॅटसमन असलेल्या कोहलीला सचिननं टीम बाहेर ठेवलंय. त्याला कुठेच जागा नाही. सध्या तसेही कोहलीचे दिवस फिरलेत. सचिनच्या टीममध्येही त्याला जागा नाही.
सचिनला क्रिकेटचा देव मानलं जातं आणि याच देवाचे लाडके खेळाडू कोण याची उत्सुकता नेहमी असते. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तो त्याची क्रिकेटपटूंविषयी, त्यांच्या खेळाविषयी नेहमी मतं व्यक्तही करतो. त्यातून अनेक नवोदीत क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळते. आताही सचिनचे ऑल टाईम क्रिकेटर्स कोण असतील असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर सचिननं दिलेलं आहे. आणि खास बात अशी की, त्याच्या 11 जणांच्या जागतिक टीममध्ये ना धोनी आहे ना कोहली. त्यामुळेच सचिनची ही टीम चर्चेत आहे.
जगातली बेस्ट Playing XI सचिननं जी प्लेईंग एलेव्हन निवडलीय, त्यातल्या काही नावांचा अंदाज येऊ शकतो. विरेंद्र सहवाग सचिनच्या टीममध्ये कसा असणार नाही? त्यामुळेच वीरु आहे. सुनिल गावस्कर आहेत, सौरव गांगुली आहे, हरभजनसिंगलाही सचिननं टीममध्ये संधी दिलीय. सचिनचा ओपनिंग पार्टनर होता वीरू, पण आता मात्र वीरुसोबत ओपनिंग पार्टनर म्हणून सचिननं त्याची जोडी सुनील गावस्करांसोबत घातलीय. वन डाऊनला म्हणजे तिसऱ्या स्थानावर सचिननं महान खेळाडू ब्रायन लाराला स्थान दिलंय. विशेष म्हणजे चौथ्या स्थानी सचिनं आणखी एका वेस्ट इंडिजच्याच खेळाडूला स्थान दिलंय आणि ते आहेत व्हीव्हीयन रिचर्डस्.
मधल्या फळीत कोण? सचिननं टॉप ऑर्डरमध्ये दोन इंडियन आणि दोन वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना संधी दिलीय तर मीडल ऑर्डरमध्ये मात्र त्यानं इंडियन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्थान दिलंय. त्यात पाचव्या नंबरला सचिननं दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर जॅक कॅलिसला ठेवलंय तर माजी कर्णधार सौरव गांगुलीला सहाव्या नंबरवर स्थान दिलंय. आश्चर्य म्हणजे विकेटकिपर धोनी ऐवजी सचिननं ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला टीममध्ये घेतलंय. सर्वात धक्कादायक म्हणजे सध्याचा जगातला बेस्ट बॅटसमन असलेल्या कोहलीला सचिननं टीम बाहेर ठेवलंय. त्याला कुठेच जागा नाही. सध्या तसेही कोहलीचे दिवस फिरलेत. सचिनच्या टीममध्येही त्याला जागा नाही.
सर्वोत्तम बॉलर कोण? सचिनची बॅटींग स्वप्नात येते अशी भीती एकदा शेन वॉर्ननं बोलून दाखवली होती. त्याला सचिनं आठव्या नंबरवर स्थान दिलंय. ज्या चार बॉलर्सना सचिननं टीममध्ये जागा दिलीय, त्यात भारतीय फक्त स्पीनर हरभजनसिंग आहे. पाकिस्तानच्या वसिम अकरम हा नवव्या स्थानी आहे. हरभजनसिंग 10 व्या आणि शेवटच्या म्हणजेच 11 खेळाडू आहे ग्लेन मॅक्ग्रा.
हे सुद्धा वाचा:
सावधान ! तुमच्या पत्रिकेत चंद्र कमजोर आहे का ? मग होऊ शकतात फुफ्फुसांशी संबंधित आजार, आताच उपाय करा
Thane Crime | दशक्रिया विधी आटोपून परतताना गावगुंडांचा हल्ला, महिलांसाह 7 जण जखमी, नेमके कारण काय ?