MI vs KKR Live Score, IPL 2022: मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक, आज पॅट कमिन्स आंद्रे रसेल बनला
MI vs KKR live score in Marathi: सध्याचा दोन्ही संघाचा फॉर्म पाहता कोलकाताचं पारडं जड वाटतय. हेड टू हेड सामने बघितले तर मुंबईची बाजू वरचढ आहे.
MI vs KKR, IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummins) आज पावर हिटिंगचा शो दाखवला. आज तो आंद्रे रसेलच्या (Andre Russell) भूमिकेत होता. अवघ्या 15 चेंडूत त्याने नाबाद 56 धावा फटकावल्या. एकवेळ डेंजरस आंद्रे रसेलला स्वस्तात आऊट केल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामना जिंकेल असं वाटलं होतं. पण पॅट कमिन्सने काही चेंडूत खेळच बदलून टाकला. त्याने आयपीएलमध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. आपल्या वादळी खेळीत त्याने चार चौकार आणि सहा षटकार लगावले. 13.1 षटकात आंद्र रसेल बाद झाला. त्यानंतर पॅट कमिन्स मैदानात आला. त्याने 16 व्या षटकात सामनाच संपवून टाकला. आंद्रे रसेलच्या वादळात मुंबई इंडियन्स उद्धवस्त झाली. खरंतर पॅट कमिन्स हा बॉलर आहे. पण त्याच्या चार षटकात 49 धावा फटकावल्या. पोलार्डने त्याच्या शेवटच्या षटकात 23 धावा चोपल्या. त्या सगळ्याची भरपाई कमिन्सने बॅटने केली. 16 व्या ओव्हरमद्ये त्याने 35 धावा चोपल्या.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कमिन्सच्या एकट्याच्या बळावर केकेआरने हा सामना पाच विकेट आणि 24 चेंडू राखून जिंकला. त्याने एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि दोन चौकार ठोकले.
Key Events
मुंबई इंडियन्स आज विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या दोन सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे.
केकेआरने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे. त्यांनी तीन सामने खेळले आहेत. यात दोन सामन्यात विजय मिळवला आहे. आजही तिसरा विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
LIVE Cricket Score & Updates
-
मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्ट्रिक, KKR चा मोठा विजय
पॅट कमिन्सने 14 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकावली आहे. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. मुंबईने दिलेले 162 धावांचे लक्ष्य KKR ने पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पार केलं. कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. या खेळीत चार चौकार आणि सहा षटकार होते.
GENTLE REMINDER: Please don’t forget to have water while Pat Cummins is batting!#KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
-
केकेआरला 30 चेंडूत 35 धावांची आवश्यकता
वेंकटेश अय्यरने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे. केकेआरच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सची गोलंदाजी धुतली. 15 षटकात केकेआरच्या पाच बाद 127 धावा झाल्या आहेत. वेंकटेश 50 आणि पॅट कमिन्स 22 धावांवर खेळतोय. केकेआरला 30 चेंडूत 35 धावांची आवश्यकता.
-
-
डेंजरस आंद्रे रसेलला मुंबईने स्वस्तात गुंडाळलं
डेंजरस आंद्रे रसेलला मुंबईने स्वस्तात गुंडाळलं. टायटल मिल्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्रेविसकडे झेल दिला. त्याने 11 धावा केल्या. केकेआरच्या 13.1 षटकात पाच बाद 101 धावा झाल्या आहेत.
Tymal attacked him with an aggressive short one & the top edge is scalped by Dewald ???
KKR: 101/5 (13.1)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #KKRvMI #TATAIPL https://t.co/ut8fubm73H
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
केकेआरची चौथी विकेट
केकेआरची चौथी विकेट. नितीश राणा OUT झाला आहे. त्याने आठ धावा केल्या. मुरुगन अश्विनने त्याला सॅम्सकरवी झेलबाद केलं.
-
मुरुगन अश्विनने KKR ला दिला झटका
मुरुगन अश्विनने KKR ला झटका दिला आहे. सॅम बिलिंग्सला 17 धावांवर OUT केलं. 10 षटकात केकेआरच्या तीन बाद 67 धावा झाल्या आहेत. वेंकटेश अय्यर 31, नितीश राणा मैदानात आहे.
-
-
MI ला मिळाली मोठी विकेट
पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये MI ला मिळाली मोठी विकेट. कॅप्टन श्रेयस अय्यरने डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर तिलक वर्माकडे सोपा झेल दिला. त्याने 10 धावा केल्या. kkr च्या दोन बाद 35 धावा झाल्या आहेत.
Sams bounces one short & Shreyas hits it to deep square where Tilak was ready! ☑️
We’ve ended the powerplay with a bang! Let’s keep going ??
KKR: 35/2 (6)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #KKRvMI #TATAIPL https://t.co/dSXRLFtwTu
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
मुंबई इंडियन्सला पहिलं यश
मुंबई इंडियन्सला पहिलं यश मिळालं आहे. अजिंक्य रहाणे सात धावांवर OUT झाला. टायमल मिल्सने त्याला सॅम्सकरवी झेलबाद केलं. KKR च्या एक बाद 20 धावा झाल्या आहेत.
Went short & Rahane didn’t get hold of the pull shot ?
Sams takes it in the deep ? https://t.co/GPQTcHEBIi
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
अजिंक्य रहाणे-वेंकटेश अय्यर मैदानात
दोन षटकात केकेआरच्या बिनबाद 9 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे-वेंकटेश अय्यर ही सलामीची जोडी मैदानात
-
कायरन पोलार्डच्या पाच चेंडूत 22 धावा
अखेरच्या हाणामारीच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकात 161 धावा केल्या आहेत. कायरन पोलार्डने शेवटची ओव्हर टाकणाऱ्या पॅट कमिन्सची धुलाई केली. त्याने पाच चेंडूत 22 धावा चोपल्या. यात तीन षटकार होते. अखेरच्या ओव्हरमध्ये MI ने 23 धावा लुटल्या. त्याआधी सूर्यकुमार यादवची 52 आणि तिलक वर्माच्या 38 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.
Action replay ekdum! ♾
Polly तात्या helps us post 1⃣6⃣1⃣!?#MI: 161/4 (20)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #KKRvMI #TATAIPL https://t.co/KTHwZUqfho pic.twitter.com/mJaQCpn5Vo
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
सूर्यकुमारची हाफ सेंच्युरी
19 षटकात मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 138 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादवने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे. तो 52 आणि तिलक वर्मा 38 धावांवर खेळतोय.
??#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI @surya_14kumar pic.twitter.com/pX24LGw6yD
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
तिलक वर्मा आणि सूर्यकुमारने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यांनी 17 व्या षटकात 17 धावा लुटल्या. मुंबईच्या तीन बाद 115 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार 36, तिलक वर्मा 33 धावांवर खेळतोय.
-
पॅट कमिन्सला ठोकला चौकार-षटकार
16 व्या षटकात तिलकने पॅट कमिन्सला चौकार-षटकार ठोकला. मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 98 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार 31 आणि तिलक 20 धावांवर खेळतोय.
-
तिलक वर्माचा SIX
KKR कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने सुंदर षटकार मारला.
-
15 ओव्हर्समध्ये MI च्या तीन बाद 85 धावा
KKR च्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आहे. 15 ओव्हर्समध्ये मुंबईच्या तीन बाद धावा झाल्या आहेत.
-
14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण
14 षटकात मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 79 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार 26 आणि तिलक वर्मा 6 धावांवर खेळतोय.
-
उमेश यादवच्या ओव्हरमध्ये 13 धावा
13 षटकात मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 71 धावा झाल्या आहेत. उमेश यादवच्या शेवटच्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सूर्यकुमारने चौकार-षटकार मारला. उमेशने चार षटकात 25 धावा देत एक विकेट काढली.
Come on, सूर्या दादा!!! ?
Need more such big hits tonight! ?#MI: 71/3 (13)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #KKRvMI #TATAIPL https://t.co/8d1tpHRLgu
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
सूर्यकुमार यादव-तिलक वर्मा मैदानात
12 षटकात मुंबईच्या तीन बाद 58 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 9 आणि तिलक वर्मा 2 धावांवर खेळतोय.
-
इशान किशन OUT
कोलकाताचे गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करत आहेत. मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 55 धावा झाल्या आहेत. पॅट कमिन्सने 11 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इशान किशनला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. इशानने 21 चेंडूत `14 धावा केल्या. यात एक चौकार आहे.
Kishan hits one straight to Shreyas as Pat strikes!#KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 https://t.co/qtNgUg3BTc
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
-
बेबी एबी OUT
सॅम बिलिंग्सकडून जबरदस्त स्टम्पिंग, दमदार बॅटिंग करणारा बेबी एबी OUT. डेवाल्ड ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बिलिंग्सने स्टम्पिंग केलं. मुंबईच्या आठ षटकात दोन बाद 46 धावा झाल्या आहेत.
VARUN HAS GOT HIS MAN!
Brevis walks back to the pavilion! https://t.co/mKx7PlmVZr pic.twitter.com/y47zGNlpxo
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
-
बेबी एबीचा पहिल्याच बॉलवर सिक्स
आठव षटक टाकत असलेल्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या चेंडूवर बेबी एबीने मिडविकेटला सुंदर षटकार मारला.
DB shining brightly on his #TATAIPL debut. ⭐?
After 7 overs, we are ➡️ 39/1#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI pic.twitter.com/BA92Hfc3ks
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
-
पावरप्लेमध्ये KKR ची टिच्चून गोलंदाजी
पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात केकेआरने टिच्चून गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सच्या एक बाद 35 धावा झाल्या आहेत. डेवाल्ड ब्रेविस 21 आणि इशान किशन 11 धावांवर खेळतो..
-
पाच षटकाचा खेळ पूर्ण
पाच ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या एक बाद 23 धावा झाल्या आहेत. बेबी एबी म्हणजे डेवाल्ड ब्रेविसने चांगली सुरुवात केली आहे. तो 14 आणि इशान किशन पाच धावांवर खेळतोय.
-
रोहित शर्माचा फ्लॉप शो
रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु आहे. रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सची पहिली विकेट गेली आहे. तीन धावांवर उमेश यादवने सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केलं. मुंबईच्या एक बाद 6 धावा झाल्या आहेत.
-
मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरुवात
केकेआरकडून उमेश यादवने पहिलं षटक टाकलं आहे. अवघी एक धाव या ओव्हरमध्ये आली. रोहित शर्मा-इशान किशनची जोडी मैदानात आहे.
-
अशी आहे KKR ची Playing – 11
Here’s how we line up against @mipaltan! ?@winzoofficial #KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 pic.twitter.com/jcM9AYijC2
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
-
अशी आहे मुंबईची Playing – 11
Paltan, here’s our ??????? ?? for our first match in पुणे! ?⚔️
2⃣ changes for us ➡️ Sky & DB replace Anmolpreet and David. ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI @Dream11 pic.twitter.com/Zgb4SUzo8y
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
Published On - Apr 06,2022 7:14 PM