Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: राहुल नंतर रोहित-द्रविड जोडीच्या आणखी एका विश्वासू खेळाडूचा टीममधून पत्ता होऊ शकतो कट

IND vs AUS, 4th Test : केएल राहुलच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याची खराब कामगिरी झाकली जात होती. पण तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे त्याच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केल जातय.

IND vs AUS: राहुल नंतर रोहित-द्रविड जोडीच्या आणखी एका विश्वासू खेळाडूचा टीममधून पत्ता होऊ शकतो कट
केएल राहुलला उपकर्णधारपदावरून काढल्यानंतर पदाबाबत रंगली चर्चा, नेमकी काय जबाबदारी असते? जाणून घ्याImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 9:22 AM

IND vs AUS, 4th Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना बाकी आहे. 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. केएल राहुलनंतर टीम इंडियातील आणखी एक खेळाडूला ड्रॉप केलं जाऊ शकतं. अहमदाबादमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात या प्लेयरला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचा हा विश्वासू खेळाडू समजला जातो. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

तिन्ही कसोटी सामन्यात त्याचा संघर्ष

इंदोर टेस्ट मॅच नंतर विकेटकीपर फलंदाज केएस भरतचा टीममधून पत्ता कट होऊ शकतो. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा केएस भरतला ड्रॉप करुन त्याच्याजागी इशान किशनला संधी देऊ शकतो. केएस भरत ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत बॅटने फ्लॉप ठरला होता. या तिन्ही कसोटी सामन्यात विकेटकीपिंग करताना संघर्ष करताना दिसला.

सातत्याने फेल

इंदोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात तो 17 आणि 3 धावा करुन बाद झाला. केएस भरत्या बॅटिंगमध्येही कुठलाही एक्स फॅक्टर दिसत नाही. ऋषभ पंत आणि इशान किशन एका सेशनमध्ये मॅचची दिशा बदलू शकतात. मीडल ऑर्डरमध्ये केएस भरत ज्या नंबरवर बॅटिंग करतोय, तिथे टीम इंडिया आपल्या स्फोटक फलंदाजाला मिस करतेय. केएस भरत नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत 8,6,23, 17 आणि 3 धावाच करु शकलाय. टीम इंडियाला सध्याच्या घडीला केएस भरतपेक्षा आक्रमक विकेटकीपर फलंदाजाची गरज आहे.

त्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजाची गरज

बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी 23 वर्षाच्या इशान किशनची निवड झाली आहे. ऋषभ पंत अपघातामुळे पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. टीम इंडियाला लोअर ऑर्डरमध्ये एका स्फोटक बॅट्समनची आवश्यकता आहे. त्यामुळेच इशान किशनचा टीममध्ये समावेश करण्यात आला. पण सुरुवातीच्या 3 कसोटी सामन्यात इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही. इशानच्या जागी केएस भरतला संधी दिली. पण तो प्रभाव पाडू शकला नाही. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्याडावात कॅप्टन रोहित शर्माने केएस भरतला रवींद्र जाडेजाच्या आधी फलंदाजीसाठी पाठवलं. टीम इंडियाला केएस भरतकडून ज्या फलंदाजीची अपेक्षा आहे, तशी बॅटिंग त्याने केलेली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंच इशान किशनला संधी देऊ शकते.

..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.