Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा

भारत आणि श्रीलंका यांच्यात 18 जुलैला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी थोडं रिलॅक्स म्हणून खेळाडू सरावासोबतच मजा-मस्तीही करत आहेत.

Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल दमशेराज खेळताना
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 4:26 PM

कोलंबो : भारताचे युवा शिलेदार श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका भारत आणि श्रीलंका संघात खेळवण्यात येणार आहे. 13 जुलैपासून सुरु होणारी ही मालिका कोरोनाच्या संकटामुळे आता 18 जुलैपासून सुरु होणार आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी थोडं रिलॅक्स होण्याकरता भारतीय खेळाडू मजा मस्ती करत आहेत. बुधवारी बीसीसीआयने खेळाडू इनडोअर खेळ खेळत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ज्यांना प्रेमाने ‘कुल्चा’ म्हटंल जात. त्या दोघांचा दम शेराज खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बहुधा दमशेराज या खेळात एकजण चित्रपटांच्या नावांना इशाऱ्याद्वारे समोर बसलेल्यांना ओळखायला लावतो. पण कुलदीप आणि चहल खेळत असलेल्या दमशेराजमध्ये चित्रपटांची नावं नाही तर भारतीय खेळाडूंची नाव ओळखली जात आहेत. ज्यामध्ये कुलदीप अभिनय करतोय तर चहल हा त्याच्या अभिनयाने खेळाडूंची नाव ओळखण्याचा प्रय्तन करत आहे. विशेष म्हणजे कुलदीपने केलेल्या अभिनयाद्वारे चहलने सर्वच्या सर्व खेळाडूंची नाव अचूक ओळखली आहेत. तर नेमक्या कुलदीपने कशा अॅक्शन केल्या ते तुम्हीच पाहा…

भारतीय संघाचा दौरा

या संपूर्ण दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने पार पडणार आहेत. ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आधी 13 जुलै रोजी सामन्यांना सुरुवात करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जु

हे ही वाचा :

IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना

ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

(Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal Playing Dum Charade Before India vs Sri Lanka Matches BCCI Shares Video)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.